Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
धुळे,साक्री तालुक्यातील डांगशीरवाडे गावातील शेतात चारित्र्यचा संशयावरून एक आदिवासी महिलेचा, तिचाच पतिने केला खून
धुळे,साक्री तालुक्यातील डांगशीरवाडे गावातील शेतात चारित्र्यचा संशयावरून एक आदिवासी महिलेचा, तिचाच पतिने केला खून
धुळे,पिंपळनेर : तरुण गर्जना वृत्तसेवा : दुसर्याचे शेत कसायला घेतलेला शेतकरी पत्नीसह बुधवारी (ता.16) रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. त्यावेळी चारित्र्याच्या संशयावरून शेतातच त्यांच्यात झालेल्या वादानंतर पतीने पत्नीचा डोक्यात व तोंडावर दगडाने ठेचून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले आहे.
डांगशिरवाडे (ता.साक्री) येथे भिल्ल आदिवासी समाजातील दिलीप हिराजी सोनवणे (वय 52) हा पत्नी मंडाबाई सोनवणे (वय 48) व मुला-मुलीसह राहतो. मात्र, पती दिलीप सोनवणे हा पत्नी मंडाबाईवर नेहमीच चारित्र्याचा संशय घेत असे. गावातील लोकांसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत, असा आरोप करत तो नेहमी मंडाबाईशी वाद घालत असे. यावरून पती-पत्नीत सातत्याने कौटुंबिक कलह निर्माण होत असे. त्यांच्यातील ही भांडणे नित्याची झाली होती. दिलीप सोनवणे याने गावातीलच एकाचे शेत कसायला घेतले आहे. बुधवारी (ता.16) रात्री त्याच्यासह त्याची पत्नी मंडाबाई असे दोघेही शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतातच त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादामुळे संतप्त झालेल्या दिलीप सोनवणे याने तान्या डोंगर भिल याच्या गट क्रमांक 343/2 मधील शेताच्या बांधावर पत्नी मंडाबाईच्या डोक्यासह तोंडावर दगडाने मारहाण केली. यात त्याची पत्नी मंडाबाईचा जागीच मृत्यू झाला.
आज सकाळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी घटनेबाबत साक्रीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांना अवगत केले. त्यानंतर मैराळे यांनी पिंपळनेर गाठले. तेथून त्यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, उपनिरीक्षक भाईदास मालचे यांच्यासह पोलिस पथक संशयित दिलीप सोनवणेला घेऊन घटनास्थळी पोहोचले. तेथे गेल्यानंतर पोलिसांनी मृत मंडाबाईचा मृतदेह आज दुपारी उशिरा पिंपळनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा