Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
मराठा समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करावं लागतंय.संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं हा माझा आयुष्यातील काळा दिवस
मराठा समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करावं लागतंय.संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं हा माझा आयुष्यातील काळा दिवस
मुंबई प्रतिनिधी: छत्रपती घराण्याच्या तलवारीची ख्याती आहे,आज या राजघराण्याला मराठा समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करावं लागतंय.संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं हा माझा आयुष्यातील काळा दिवस आहे असं शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलंय.मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत.
त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी धैर्यशील माने त्या ठिकाणी पोहोचले आहेत.खासदार धैर्यशील माने म्हणाले की,"माझे राजे उपाशी असताना मी घरात कसा बसेन? मी इथं छत्रपतींचा मावळा म्हणून आलोय.दिल्लीमध्ये आम्ही राजेंच्या सोबत लढतोय.आज मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राजघराण्याला उपोषणासाठी बसावं लागतंय हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस आहे."
खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आझाद मैदानावर आलेले खासदार धैर्यशील माने हे पहिलेच शिवसेना प्रतिनिधी आहेत.
खासदार धैर्यशील माने म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या या संदर्भात बैठका सुरू आहेत.काहीही करून आजचा दिवस उलटता कामा नये.मी या संबंधी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाने मांडणार असून यावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल."आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे.
यावेळी त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती या देखील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या की,"संभाजीराजे आमरण उपोषणाला बसले आहेत,ही वेळ यायला नको होती.परंतु सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत.त्यामुळे ही वेळ राजेंवर आली आहे.मी स्वतः शेवटपर्यंत आंदोलनात सहभागी राहणार आहे."आपला लढा हा 30 टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठा समाजासाठी असल्याचे संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
जळगाव प्रतिनिधी / जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षण व वेतन विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी हे दलालांच्या थेट संपर्कात असल्याची गंभीर चर्चा जि...
-
पिंप्रीगवळी प्रतिनिधी - तालुका मोताळा, जिल्हा, बुलढाणा भागातील शेतीशिवारात काल शनिवारला रात्री अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य अवकाळी पाऊस पडल्यामु...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा