Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

वंदना पाटील नेट परिक्षा उत्तीर्ण..!



शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर येथील रहिवासी तथा शहादा तालुक्यातील शहाणा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिका वंदना सुरेश पाटील या नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्या या यशाबद्दल आमदार अमरिशभाई पटेल,नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल,उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,आर सी पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,नगरसेवक प्रभाकरराव चव्हाण, शहादा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी डी.टी.वळवी,केंद्रप्रमुख एस.ई. ईशी,प्राचार्य पी.आर.साळुंखे,मुख्याध्यापक रामलाल तावडे,आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाचे कर्मचारी वर्ग तसेच जिल्हा परिषदचे कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले. 

त्यांना प्रा.डॉ.माधव कदम,अहिल्यापुर शाळेचे उपशिक्षक एस.एन.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.वंदना पाटील या उमवि सिनेट सदस्य व आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक अमोल सोनवणे यांच्या पत्नी आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध