Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

'मलिक जेलमध्ये,अजित पवार बाहेर कसे ? असदुद्दीन ओवैसी



एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नवाब मलिक यांच्या अटकेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत असदुद्दीन ओवैसी यांनी एका प्रचारसभेत भाषण करताना अजित पवारांवर टीका केली.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले,आझम खान हे अखिलेश सरकारमधील मंत्री होते,मुख्यमंत्री अखिलेश होते आणि आझम खान मंत्री होते.आता आझम खान जेलमध्ये आहेत तर मुख्यमंत्री अखिलेश बाहेर का आहेत ? द्या उत्तर ...तसंच महाराष्ट्रात नवाब मलिक जेलमध्ये आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. 

ते बाहेर आहेत आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत.हे काय सुरू आहे ? तुमचा नेता असेल तर लढेल हे समजा तुम्ही , पुढं बोलताना ओवैसी म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते.आता नोकर्या देण्याऐवजी शेणखतापासून पैसे कमावण्याचे सूत्र सांगत आहेत.दुहेरी इंजिन असलेलं हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरत आहेत.सपा आणि बसपा यांनी फक्त मते घेतली पण काम केली नाहीत.ज्यांचा नेता नाही त्यांचा आवाज नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध