Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

दिनांक २७ रोजी मनसेने मराठी भाषा दिवस साजरा




शिरपूर प्रतिनिधी:दिनांक २७ रोजी मनसेने मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आले
माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व विनय भोईटे साहेब यांचे मार्गदर्शनानुसार धीरज देसले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कविवर्य कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांच्या जन्मदिनी निमित्त मनसेकडून मराठी दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. 


मराठी दिवसा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मराठी सकाळ वृत्तपत्रचे पत्रकार सचिन दादा पाटील मराठी साहित्यिक डॉ.प्राध्यापक. फुला बागुल सर,प्राध्यापक.संतोष पाटील,तरुण गर्जना चे संपादक संतोष भोई,लोकमतचे ग्रामीण प्रतिनिधी संदीप ईशी,यांच्या मनसेकडून सत्कार करण्यात आला व मराठी दिन विशेष म्हणून सचिन दादा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना मराठी भाषा टिकली पाहिजे यासाठी ग्रामीण भागातील लोकांनी मराठी शाळेत शिक्षण घेणे आवश्यक आहे. 


मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या मुलांना मराठी माध्यमिक शाळेमध्येच शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. मनसे संस्थापक अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे नेहमीच मराठी व मराठी भाषेविषयी प्रश्न उपस्थित करत असतात. प्राध्यापक संतोष पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.भारतीय इतिहासात मोगल आले इंग्रज आले पोर्तुगीज व डच आले मराठी भाषेचे प्रेम महाराष्ट्रीयन लोकांची कमी झालेली नाही. वरिष्ठ राजकारणी यांनी महाराष्ट्र गुजरात यांचा सौराष्ट्र निर्माण केला मात्र मराठी प्रेमा मुळे  महाराष्ट्राची निर्मिती  झाली. माननीय राज साहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन वेळेसच सर्वप्रथम दुकानदारांच्या मराठी पाट्यांसाठी पहिले आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर केले होते. 


एवढे नव्हे तर मराठी भाषेवर असीम प्रेम या महाराष्ट्रातील एकमेव नेते म्हणजे माननीय राज साहेब ठाकरे आहेत अशी भावना संतोष पाटील सरांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी,मनसे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे, मनसे शहराध्यक्ष चेतन राजपूत,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष सोनू राजपूत,मनसे तालुका उपाध्यक्ष विलास परदेशी,मनसे तालुका उपाध्यक्ष रमेश अहिरे,मनसे शहर उपाध्यक्ष अभित कुरेशी,नीरज जाधव,मनसे शहर उपाध्यक्ष मेहमूद तेली,सहसचिव अमोल गुजर, मनविसे शहर उपाध्यक्ष राहुल शिराळे, मनसे विभाग अध्यक्ष आकाश भोई, विभाग अध्यक्ष जावेद तेली,विभाग अध्यक्ष राकेश चौधरी,रतिलाल कोळी,वसंत कोळी,मनोज पाटील,विभाग अध्यक्ष रेहान तेली,जीवन भिल,आनंद मालचे, सावन पवार,मनोज पवार,बळीराम पवार, अविनाश मालचे, समाधान मालचे,अजय राजपूत,नरेश तिरमले, गौरव बारी,अक्षय बारी, व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध