Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरींच्या उपस्थितीत भाजपा तर्फे शिवरायांना मानवंदना



शिरपूर प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी शिरपूर तर्फे येथील शिवाजी महाराज व्यापारी संकुल मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्ध्याकुती पुतळ्यास दि.19 फेब्रुवारी रोजी 'शिवजयंती निमित्य हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा प्रमुख उपस्थितीत त्यांचा हस्ते पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील,मा. जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड,माजी जिल्हा चिटणीस संजय आसापुरे,सुनिल चौधरी,महेंद्र पाटील,मुबीन शेख,रफीक तेली,रविंद्र भोई,जयवंत पाटील,नंदु माळी, निलेश देशमुख यांचेसह प्रमुख मान्यवर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

यावेळी ढोलताश्याच्या गजरात बबनराव चौधरी यांचे हस्ते पुजन करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध