Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

शेणपूर गावात शिव जन्मोत्सव शासनाचे कोरोना नियम पाळून मोठया जल्लोषात व उत्साहात साजरा



आज दिनांक19 फेब्रुवारी 2022 रोजी ग्राम पंचायत कार्यालय शेणपूर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली .  याप्रसंगी प्रमुख वक्ते श्री बालाजी फड माध्यमिक शिक्षक व गावातील जेस्ट नागरिक यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांनंतर दादासो श्री प्रा.बालाजी फड परळी. (बीड) यांनी छत्रपती शिवाजी महाराज, हे एक "धर्म सहिष्णु  राजा" याचा चारित्र्य बद्दल उत्कट माहिती सांगितली व त्यांचे विचार घेऊन तरुण पिढीला काय प्रेरणा मिळते. हे त्यानी आपल्या वक्तृत्वातून सांगण्याचं प्रयत्न केला. व शेणपूर गावतर्फे शिवरायांच्या जयंती निमित्त महाराजांचा पुतळ्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच  याप्रसंगी शिव जयंतीचे औचित्य साधून तरुणांनी व्यसनांचा आहारी न जाता शिक्षण,नोकरी, व्यवसाय यावर जास्त भर दिली पाहिजे. तरच येणारी पिढी ही या देशाचे, राज्याचे आणि धर्माचे रक्षण करू शकेल अन्यथा भारत देशाला परत पारतंत्र्यात जाण्यापासून आपण वाचउ शकनार नाही.व काही तुरळक व्याख्यात्यांनी आपली खिसे भरण्यासाठी महाराजाचा चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला हे अतिशय वाइट आहे. शेणपूर गावातील अनेक वर्षां पासून शिव जन्मोत्सव अत्यंत खेळीमेळी चा वातावरनात पार पडत आला आहे.तिचं परंपरा कायम ठेवत गावातील अनेक तरुण मित्र मंडळींनी आपला विशेष सहभाग नोंदविला त्यात 
 मुख्यत्त्वे धीरज काकूंस्ते,राजशेखर अहिरराव,गणेश काकूंस्ते, आकाश काकूंस्ते,प्रवीण काकूंस्ते,योगेश काळे,पृथ्वीराज काकूंस्ते,दादू काकूंस्ते,बाळा वाघ,श्रीकांत काकूंस्ते, सनी पगारे,राहुल काकूंस्ते,बाबा पगारे,दादू पगारे,गौरव काकूंस्ते,विक्की भदाणे,हर्षल काळे,अनिकेत काळे,मेघराज नंदन,दानिश काकूंस्ते,निलेश काकूंस्ते,विक्की पगारे,लकी पगारे,निलेश काकूंस्ते,ई.यांनी करोना सारख्या महामारी मध्ये सरकारी नियमच पालन करून शिव जन्मोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करून आपली परंपरा कायम जपली गेली पाहिजे.असे प्रतिपादन गावातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच,सदस्य व गावातील ग्रामस्थ व तरुण मित्र,महिला यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले..व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या बद्दल शेणपूर ग्रामपंचायत कडून त्यांचे आभार मानण्यात आले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध