Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

जुने कोडदे येथील खालची वाट शिवारातील तोडणीवर आलेल्या उसाच्या शेताला आज सकाळी अकराच्या सुमारास आग



जुने कोडदे येथील खालची वाट शिवारातील तोडणीवर आलेल्या उसाच्या शेताला आज सकाळी अकराच्या सुमारास आग लागली.तोडणीवर आलेल्या व दोन महिन्यांपासून पाणी बंद असलेल्या या उसात आगीने रौद्र - रूप धारण केले . पाहता पाहता अनेक शेतकऱ्यांचा सुमारे १०० ते १२५ एकरवरील ऊस अक्षरशः खाक झाला.दरम्यान,आगीची माहिती मिळताच दोंडाईचा येथील नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

मात्र,आगीची भीषणता आणि दोनच बंबांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत होत्या.जुने कोडदेतील खालची वाट शिवारातील शेतात अनेक शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन घेतले आहे . आज सकाळी एका शेतातील उसाला अचानक आग लागली.पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि आगीच्या ज्वाळांनी सुमारे १०० ते १२५ एकरवरील उसाला आपल्या लपेटात घेतले आगीची माहिती मिळताच दोंडाईचा पालिकेच्या अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी पोहोचला.त्याने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

तोपर्यंत दुसरा बंबही दाखल झाला . मात्र , परिसरात ३०० ते ४०० एकर क्षेत्रात सर्वत्र ऊसच असल्याने त्यालाही धोका निर्माण झाला होता . दुपारी दोनपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते . मात्र,आग धुमसतच होती.यामुळे याहून अधिक मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या आगीत किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले,याबाबत माहिती प्राप्त होऊ शकली नाही.मात्र,ऐन तोडणीवर आलेल्या उसाला आग लागल्याने शेतकऱ्यांांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध