Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

लोखंडी रॉड डोक्यात मारत तरुणाचा खून दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल



दोंडाईचा प्रतिनिधी:शहरातील गोपालपुरा भागात डोक्यात लोखंडी रॉड टाकत तरुणाचा खून करण्यात आला.काल रात्री ही घटना घडली.याप्रकरणी एकावर  दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण संतोष तिरमले (रा.गोपालपुरा, दोंडाईचा) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याला गोविंद नगरात राहणारा सागर राजेंद्र तिरमले हा पत्नीवरून शिवीगाळ करीत होता.त्यावरून काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. त्यात सागर याने अरुण याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. त्या अरुण हा गंभीर जखमी झाला. त्याला कॉटेज रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ राहुल भाईदास तिरमले यांच्या फिर्यादीवरून सागर तिरमले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध