Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२
धुळे जिल्ह्यातील 11 स्वस्त धान्य दुकाने निलंबित
शिरपूर प्रतिनिधी:-फक्त स्वस्त धान्य दुकानाचा परवाना घेतला तथापी लाभार्थींना कोणतीही सेवा दिली नाही,कोणत्या ना कोणत्या कारणाने वर्षानुवर्ष दुकाने अकार्यान्वित ठेवली,कोरोना कालावधीमध्ये ग्राहकांना सेवा दिली नाही. वैद्यकीय रजेचे कारण पुढे केले म्हणून धुळे जिल्ह्यातील सुमारे 11 स्वस्त धान्य दुकाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी निलंबित केले आहेत.त्यांना नोटिसा देण्यात आल्या असून त्यांचा खुलासा प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
निलंबित करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानामध्ये शिरपूर तालुक्यातील रवींद्र सजन पावरा दुकान क्रमांक 126 चिलारे, योगेश माधवराव पाटील दुकान क्रमांक 63 बलकुवे,शनी मंदिर ट्रस्ट दुकान क्रमांक 184 उंटावद,नरेंद्र नारायण सोनवणे दुकान क्रमांक 193 खर्दे बु., राकेश दुलबा पावरा दुकान क्रमांक 136 वाकपाडा,राजेन्द्र नथू पाटील दुकान क्रमांक 153 साकवाद,पी झेड ठाकूर दुकान क्रमांक 105 थाळनेर आणि शिंदखेडा तालुक्यातील भीमगर्जना महिला बचत गट दुकान क्रमांक 105 विखुरले, सोनाऱ्या रानमळा महिला बचत गट दुकान क्रमांक 150 चांदगड,रमेश महादेव भावसार दुकान क्रमांक 72 वायपूर, मातोश्री महिला बचत गट दुकान क्रमांक 180 शिराळे हे सर्व दुकानदार तीन महिनेपेक्षा जास्त कालावधी करिता वैद्यकीय रजेवर असल्यामुळे सदर दुकानांचे प्राधिकार पत्र पुढील एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आलेले आहे.
शासनाच्या 12 नोव्हेंबर 1991 च्या निर्णयाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदार जास्तीत जास्त तीन महिन्यापर्यंत वैद्यकीय रजेवर जाऊ शकतील अन्यथा त्यांना राजीनामा द्यावा लागेल अशी तरतूद असतानाही संबंधित स्वस्त धान्य दुकानदार हे वर्षानुवर्ष रजेवर गेल्याने त्याचा ताण इतर स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर तसेच पुरवठा यंत्रणेवर पडत आहे.ही बाब लक्षात घेऊन सदरची कारवाई करण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा