Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

संभाजी छत्रपतींना वर्षा बंगल्यावरून चर्चेसाठी निमंत्रण..!



मी समाजाला वेठीस धरलं नाही संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे.यावेळी आक्रमक पवित्रा घेत त्यांनी आमरण उपोषण पुकारलं आहे.26 तारखेपासून आझाद मैदानात त्यांनी उपोषणाला सुरुवात केली.मात्र,त्यांची प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय याआधी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी छत्रपतींची भेट घेतली.यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय.संभाजी छत्रपतींना वर्षा बंगल्यावरून चर्चेसाठी निमंत्रण आलं आहे.

यासाठी ते स्वत : न जाता मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणार आहेत.त्यांना संयमाने भूमिका मांडण्यासाठी संभाजीराजेंनी आवाहन केलं आहे.आता खूप त्रास होऊ लागलाय,पण तरीही समाजाठी मी झटणार असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.काय म्हणाले छत्रपती ? हे आंदोलन माझ्या प्रकीसाठी थांबण गरजेचं कोणालाही सांगता येत नाही...आरक्षण कधी मिळेल या मागण्या राज्य सरकार मान्य करू शकतं २२ मागण्या आहेत...त्यातील प्रमुख ५-७ मागण्या माझ्या आहेत आज खूप त्रास होतोय...सरकार आणि समाजानेच ठरवावं मला कुठे न्यायचंय आज सकाळी कॉल आला आहे.यावर मार्ग काढण्यासाठी समाजाचा प्रश्न निकाली लागण महत्वाचं गरीब मराठ्यांचा प्रश्न मार्गी लागणं महत्वाचं आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध