Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

"दोन थेंब प्रत्येकवेळी पोलिओवर विजय दरवेळी" सभापती सौ धरती देवरे यांचे आवाहन.



आज २७ फेब्रुवारी २०२२ रोजी "पल्स पोलिओ" लसीकरणनिमित्त- प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचवार,प्रा.आ.केंद्र लामकाणी व प्रा.आ.केंद्र बोरीस येथे प्रत्यक्ष जाऊन "सौ.धरतीताई निखिल देवरे" (सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प.धुळे) यांनी पोलिओ बूथवर भेट दिली.समवेत बोरीस,लामकाणी, चिंचवार येथील ग्रामपंचायत सरपंच बशीर पैलवान देशमुख उपसरपंच श्री दत्तात्रय मासुळे,शांतीलाल पाटील कैलास पाटील,सोमनाथ भाऊसाहेब पाटील,रतिलाल पाटील, कैलास पाटील सर,नाना वाघ,कदीर दादा पटेल,नाना वाघ, भटु रुपला कोळी,देवाजी मासुळे,जिभाऊ मासुळे, जगन मासुळे,दासभाऊ हालोर, गंगा महाराज,लामकानी येथील माजी सरपंच नाना पाटील माजी पं स सदस्य बी.सी.महाले सर,सागर पाकळे,सागर पाटील, जितेंद्र महाले वैद्यकीय केंद्र अधिकारी डॉ चव्हाण सर,श्री पगारे श्री शेखर शिंदे,वंदना मोरे,पगारे नाना तथा इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या रहिवास क्षेत्रातील नजीकच्या पोलिओ बूथवर लहान बालकांना पोलीओ डोस नक्की द्यावा असे आवाहन यावेळी सभापती सौ देवरे यांनी केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध