Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय संसदरत्न खा.हिना गावित यांचा उपस्थितीत साक्री तालुक्यात विकासकामांचा लोकार्पण सोहळा दहीवेल,भोंनगाव येथे करण्यात आले



आज दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून चिंचपाडा -बोदगांव-भोनगांव-आमोडे-झंजाळे - सामोडे ह्या गावांना जोडणारा कोअर नेटवर्क रस्ता TR-20 कामाचे उद्दघाटन मा.खा.ताईसो.डाॕ.हिनाताई विजकुमार गावित सो.यांचे शुभहस्ते भोनगांव येथे करण्यात आले सदर रस्ता साधारणतः ९९४.४१ लक्ष प्रशासकीय मान्यतेच्या व १०.८६ किमी लांबीच्या क्षेत्रातील गावांना जोडल्या गेल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असुन सदर कामात रस्ता रुंदिकरण/खडीकरण/डांबरीकरण व स्लॕबड्रेन व पाईपमोर्यांच्या बांधकामाचा समावेश असणार आहे. सदर कार्यक्रमासाठी मा.दादासो.खंडुशेठ कुवर (जि.प.सदस्य), मा.नानासो.विजय ठाकरे (जि.प.सदस्य),मा.दादासो.साहेबराव गांगुर्डे (जि.प.सदस्य धुळे) मा.ताईसो.हिराबाई सोनवणे (पं.स.सदस्य साक्री), मा.ताईसो.संगिताताई गणेश गावित (पं.स.सदस्य साक्री) मा.काकासो.संतोष वसईकर ,नगरसेवक नंदुरबार , मा.बापुसो.वसंतराव घरटे (सामाजिक कार्यकर्ते ), मा.दादासो.सुधीर अकलाडे(सामाजिक कार्यकर्ते ), दादासो.गणेश गावित (सामाजिक कार्यकर्ते ), मा.दादासो.सुजन सोनवणे (सामाजिक कार्यकर्ते) बाबासो.धनंजय अहिराव (सरपंच , भाडणे) दादासो.के.टि.सुर्यवंशी (सामाजिक कार्यकर्ते ) , दादासो.हिम्मत सोनवणे (मा.उपसरपंच दहिवेल) , दादासो.अविनाश बच्छाव (उपसरपंच, दहिवेल) यांचे समवेत भोनगांव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध