Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ मार्च, २०२२

साक्री तालुक्यातील अनेक गावाना सन.20018-19 चा दुष्काळी निधी आजतागायत मिळालेला नाही यासाठी साक्री तालुक्यातील काटवान भागातील शेतकरी आंदोलनाचा पवित्र्यात



’साक्री तालुक्यातील (जि.धुळे) , म्हसदी, काळगांव, वसमार, घमनार, दातर्ती, ककाणी, भडगाव (वा.), शेवाळी (मा) शेणपुर,मंलाजन,धाडणे या गावातील शेतक-यांना सन २०१८ खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीतील अनुदान अद्यापही वाटप करण्यात न येणे, दि.३०/०७/२०१९ व दि.२२/१०/२०१९ रोजी सहाय्यक संचालक (लेखा), विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी शासनाकडे अनुदान मागणी प्रस्ताव सादर केलेला असणे, परंतू अद्यापही साक्री तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याना २०१८ खरीप हंगामातील नुकसानीपोटी अनुदान वाटप करण्याकरीता निधी उपलब्ध न होणे, परिणामी उक्त गावातील शेतक-यांनी धरणे आंदोलन करणे, धरणे आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाउâन शेतक-यांना शासनाकडून निधी प्राप्त होताच अनुदान वाटप करण्यात येईल असे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी, धुळे यांना कळविल्यानंतर त्यांनी शेतक-यांना अनुदान वाटपाचे आश्वासन देणे, परंतू शासनाकडून अद्याप अनुदानाची रू 97.21कोटी ची रक्कम जिल्हाधिकारी, धुळे व तहसिलदार (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांच्याकडे प्राप्त न होणे, परिणामी नुकसानग्रस्त शेतक-यांच्यात वाढती असुरक्षितता व त्यातून निर्माण झालेला तीव्र असंतोष, शासनाने तातडीने खरीप २०१८ हंगामात साक्री तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत बाधीत शेतक-यांना तात्काळ अनुदान वाटप होण्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर करण्याची आवश्यकता.’

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध