Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ मार्च, २०२२

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर याचा राजीनामा, महिला आयोगचा अध्यक्ष पद हे संविधानिक पद असल्याने चाकणकरांचा राष्ट्रवादी ला जय महाराष्ट्र



महिला पदाधिकाऱ्यांना रडू कोसळलं; राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसाहेब, व राज्यमंत्री आदितीताई तटकरे स्तब्ध!....
"महिला प्रदेशाध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल मा. जयंत पाटीलसाहेब आणि पक्षाचे आभार मानते. माझ्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद देखील आहे. हे संविधानिक पद असल्याने त्या पदावर निष्पक्षपातीपणे काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे मी आज राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देते", असं रुपालीताई चाकणकर म्हणाल्या. त्यानंतर उपस्थित महिलांनी एकच गोंधळ केला. 'नाही, तुम्ही राजीनामा द्यायचा नाही', असं उपस्थित महिला पदाधिकारी मोठ्याने ओरडत होत्या. दरम्यान काही महिला पदाधिकाऱ्यांना अश्रूही अनावर झाले. यावेळी, रुपालीताई चाकणकर यांनी आपलं भाषण थांबवलं. महिलांचा आवाज शांत झाल्यावर त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. शेवटी पदाधिकाऱ्यांची समजूत काढत त्यांनी आपल्या राजीनाम्याचं पत्र जयंत पाटलांकडे सादर केलं. हा सगळा प्रकार मंत्री जयंत पाटीलसाहेब आणि राज्यमंत्री आदितीताई तटकरे स्तब्ध होऊन बघत होते.
"पक्षाने दिलेली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडण्याचा मी प्रयत्न केला. संघटनेच्या कामाची पोचपावती म्हणून पक्षाने मला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी दिली. एका सामान्य कार्यकर्तीला एवढं महत्त्वाचं पद देऊन जयंत पाटीलसाहेब आपण कार्यकर्ते, महिला संघटनेचा सन्मान केला, त्याबद्दल आभारी आहे. गेली सहा महिने माझ्याकडे महिला विंगच्या प्रदेशाध्यक्षपदाचा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा दुहेरी भार आहे. महिला आयोगाचं अध्यक्षपद संविधानिक पद असल्याने त्या पदावर निष्पक्षपातीपणे काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे मी आज राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देते. महिला पदाधिकाऱ्यांनी खचून जाऊ नका. मी कायम तुमच्या बरोबर असेल. काहीही गरज लागू द्या, कधीही फोन करा, तुमच्या मदतीला रुपालीताई चाकणकर उभी असेल", अशा शब्दात त्यांनी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना धीर दिला.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

1 टिप्पणी:

प्रसिद्ध