Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २६ मार्च, २०२२

धुळे तालुका पोलिसांनी ट्रकमधून मालेगावहून सुरतमध्ये नेण्यात येणारी सुमारे 25 लाखांची रोकड जप्त



धुळे प्रतिनिधी : धुळे तालुका पोलिसांनी ट्रकमधून मालेगावहून सुरतमध्ये नेण्यात येणारी सुमारे 25 लाखांची रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.ही रक्कम हवाल्याची असल्याचा संशय असून त्या दृष्टीने आयकर विभागाशी पत्रव्यवहार केला जात आहे.धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारात शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून 

कारवाई धुळे तालुक्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना ट्रकमधून रोकड नेली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने शनिवारी मध्यरात्री कुसुंबा उड्डाणपुलाखाली सापळा रचला.

यावेळी कुसुबामाग सुरतकड जाणारा ट्रक ( क्र.एम.एच.17 ए.जी .0592 ) ची तपासणी केल्यानंतर त्यात कॅबीनमध्ये रोकड आढळली.ट्रक चालक शेख शफीक शेख अहमद (57,रा.गुलशेर नगर,मालेगाव ) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने ही रक्कम मालेगावच्या विजयभाई बाबुभाई पटेल यांची असल्याचे सांगत ती सुरत येथे देण्यात येणार असल्याची माहिती दिली.ट्रकसह चालकाला पोलिसांनी अधिक कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे .

यांनी केली कारवाई 

ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील,अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील,
उपनिरीक्षक प्रकाश पाटील,हवालदार प्रवीण पाटील,प्रमोद ईशी,नंदु चव्हाण,प्रकाश भावसार,कुणाल शिंगाणे,राकेश मोरे,कांतीलाल शिरसाठ , रवींद्र राजपुत,निलेश पाटील यांच्या पथकाने केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध