Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २३ मार्च, २०२२

पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेऊन अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करण्याचा मोदी सरकारचा संकल्प चांगलाच पण तो पूर्णत्वास कसा नेणार ? पुढचे पाऊल कधी टाकणार ते सांगा ? असा थेट सवाल शिवसेनेनं भाजपला विचारला



पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेऊन अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करण्याचा मोदी सरकारचा संकल्प चांगलाच आहे,पण तो पूर्णत्वास कसा नेणार ? लडाखमध्ये घुसलेले चिनी सैन्य आपण अद्याप बाहेर काढू शकलेलो नाही.दहशतवाद जसा पाकिस्तानचा आहे,त्यापेक्षा जास्त चीनचा आहे.

त्याचा विसर पडलेले लोक नवे संकल्प सोडत आहेत.कश्मिरी पंडितांचे व कश्मीरचे राजकारण थांबवून पुढचे पाऊल कधी टाकणार ते सांगा ? असा थेट सवाल शिवसेनेनं भाजपला विचारला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू - कश्मीरचा भाग ( पीओके ) परत घेण्याबाबत 1994 मध्ये संसदेत प्रस्ताव मंजूर झाला होता.

त्यानुसार हा भाग स्वतंत्र करून पुन्हा हिंदुस्थानला जोडण्याचा आमचा संकल्प असल्याचे जितेंद्र सिंह म्हणाले.कलम 370 रद्द होईल असे कुणाला वाटले होते काय ? पण केंद्र सरकारने तो संकल्प पूर्ण केला.आता पुढचे पाऊल पाकव्याप्त कश्मीर आझाद करण्याचे,असे आपले केंद्रीय मंत्री सांगतात,त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे.आता प्रश्न असा आहे की,पाकच्या ताब्यातील कश्मीर सोडविण्यासाठी मोदी सरकारला उचलावी लागतील.त्यातले पहिले पाऊल ते कधी टाकणार ? असा सवाल सेनेनं विचारला


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध