Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
राज्यात पत्रकारांवर हल्ल्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, २९ गुन्हे दाखल कठोर अंमलबजावणी ची शासना कडून प्रतीक्षा
राज्यात पत्रकारांवर हल्ल्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, २९ गुन्हे दाखल कठोर अंमलबजावणी ची शासना कडून प्रतीक्षा
मुंबई ,राज्यात पत्रकारांवर हल्ल्यांचे २९ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले.शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीअंतर्गत मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजामधून अधिस्विकृतीधारक पत्रकारांना दुर्धर आजार,अपघात झाल्यास किंवा त्यांच्या मृत्यूपश्चात वारसांना मदत करण्यात येत आहे.
याशिवाय महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये केशरी आणि पिवळे शिधापत्रिकाधारक किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला असलेल्या पत्रकारांचा समावेश करण्यात आला असल्याचे तटकरे यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज विधानसभेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना अदिती तटकरे यांनी वरील माहिती दिली.
शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण योजनेंतर्गत अधिस्विकृतीधारक पत्रकार आणि त्याची पत्नी/पती तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेली मुले यांना वैद्यकीय उपचारार्थ आर्थिक मदत देण्यात येत आहे.या योजनेंतर्गत आजवर २५८ पत्रकार आणि त्यांचे कुटुंबिय यांना एकूण १ कोटी ५८ लाख ५२ हजार ७११ एवढी रक्कम वैद्यकीय कारणास्तव आर्थिक मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकारांना सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्याची सुविधा देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये केशरी आणि पिवळे शिधापत्रिकाधारक किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला असलेल्या पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेमुळे राज्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबियांना याचा फायदा झाला आहे. याच दृष्टीकोनातून महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये पत्रकारांचा समावेश करण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी दिली.शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत पूर्वी १० कोटी रुपयांची तरतूद होती.
गेल्या दोन वर्षात त्यामध्ये आणखी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,असेही त्यांनी सांगितले.राज्यातील प्रसारमाध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रसारमाध्यमातील व्यक्ती किंवा प्रसारमाध्यम संस्था यांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा हानी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच अनुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता त्याअंतर्गत आजवर २९ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यावरही निर्णय घेण्यात येणार असल्याचे तटकरे म्हणाल्या.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा