Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ मार्च, २०२२

जमीन व्यवहारात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या ईडीच्या कोठडीत वाढ



जमीन व्यवहारात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे . आज कोर्टाने पुन्हा नवाब मलिक यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे.त्यांची कोठडी ७ मार्च पर्यंत न्यायालयाकडून वाढवण्यात आलेली आहे.नवाब मलिक यांच्या वरून अधिवेशनातही मोठा गदारोळ झाला.

एखादा मंत्री जेलमध्ये असतानाही त्यांच्या कडून राजीनामा घेतला जात नाही अशी भयानक परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली आहे,अशी टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदशी संबंधित अशा व्यक्ती कडून जमीन विकत घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांच्या वर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध