Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
पांढऱ्या शुभ्र आणि तितक्याच चविष्ट गाठी तयार करण्यासाठी भोई कुटुंब परिसरात प्रसिद्ध
पांढऱ्या शुभ्र आणि तितक्याच चविष्ट गाठी तयार करण्यासाठी भोई कुटुंब परिसरात प्रसिद्ध
तोरखेडा प्रतिनिधी: होळी म्हंटल की रंगाबरोबरच बाजारात हमखास एका खाद्यपदार्थांची दुकान थाटलेलीअसतात,तो पदार्थ म्हणजेसाखरेच्या गाठी
होळीच्यानिमित्ताने या गाठी एकमेकांना भेट दिल्या जातात खान्देशातील तर अनेक घरांमध्ये अशा साखर गाठी तयार करण्याचा उद्योग पिढ्यान पिढ्या चालत आहे.
शाहादा तालुक्यातील भोई कुटुंबीय सुद्धा गेल्या चार पिढ्यापासून हा व्यवसाय करत आहेत.होळी आणि गुढी पाडव्याची चाहूललागली की साखरेच्या गाठ्यांचे रेडीमेड हार बाजारात आपल्याला नेहमी पाहायला मिळतात पण अनेक कुटुंबामध्ये या गाठी निर्मितीचा व्यवसाय परंपरागत रित्या चालत आला आहे.
अशा परंपरेतूनच तालुक्यातील तोरखेडा छगन भोई गेल्या महिनाभरापासून आपल्या कुटुंबाबरोबर त्या तयार करण्याच्या कामाला लागले आहेत.या दिवसात मोठी मागणी असल्याने या कामाला शिवरात्री पासूनच सुरवात होते आणि सधारण गुढीपाव्यापर्यंत या कामाची लगबग सुरु राहते.पांढऱ्या शुभ्र आणि तितक्याच चविष्ट गाठी तयार करण्यासाठी भोई कुटुंब परिसरात प्रसिद्ध आहे.वडिलोपार्जित नव्हे तर गेल्या चार पिढ्यांचा हा उद्योग त्यांनी आजही तितक्याच समर्थ पणे यशस्वी करून दाखवला आहे.
वर्षातून केवळ एक महिनाच हे काम असल तरी मोठी मागणी असल्याने ते वेळेवर पार पडणे आवश्यक असते . या साखरगाठीची रेसेपी साधारण वाटत असल तरी या मागे मोठी मेहनत घ्यावी लागते.सर्व कुटुंब या दिवसात भल्या पहाटे उठून या कामाला लागतात,असे भोई यांनी सांगितले.सुरवातीला एका कढईला उष्णता देऊन यात गरजे नुसार पाणी आणि साखर टाकली जाते नंतर यात दुध टाकून ते अधिक शुभ्र आणि चवदार होईल याची काळजी घेतली जाते.
मग याला चाचणी देऊन या साखरेचे पाणी एका लाकडी साचात दोरे टाकून भरले जाते. काही वेळाने ते थंड झाले की हे लाकडी साचे वेगळे काढले जातात मग यातून तयार होतो तो साखरेचा पांढरा शुभ्र हार. ग्रामीण भागात परंपरेने चालत आलेले हा उद्योग आजच्या मार्केटिंगच्या काळातही धरपडत का होईना शाबूत असल्याने काही कुटुंबाना वर्षातून एका महिन्याचा हा चांगल्या रोजगार उपलब्ध झाला आहे.
मात्र आज मोठ्या व्यवसायाच्या स्पर्धेत ही खानावळीची परंपरा किती शाबूत राहील हा एक प्रश्नच आहे.अनेक वर्षाच्या या पदार्थ परंपरेमुळे होळी आणि गुढी पाडव्याला आता अशा साखर गाठींना धार्मिक महत्व येत आहे.मात्र अस असले तरी दिवाळीला लाडू,करंज्या आणि संक्रांतीला तिळगूळ या प्रमाणेच होळी पाडव्याला या साखरगाठीचे मोठे महत्व असते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
नंदुरबार जिल्हा आदिवासी असूनही केवळ तुटपुंजी ₹४५ लाखांची मदत; शासनाच्या निष्काळजीपणाचा शेतकऱ्यांमध्ये संताप तहाडी:- नंदुरबार जिल्हा हा महार...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा