Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ७ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
लालपरी विलीनीकरणाच्या विळख्यात रुसून बसल्याने खाजगी प्रवाशी टॅक्सी व रिक्षा मात्र खदखद हसताना दिसली
लालपरी विलीनीकरणाच्या विळख्यात रुसून बसल्याने खाजगी प्रवाशी टॅक्सी व रिक्षा मात्र खदखद हसताना दिसली
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाणारी व प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असलेली लालपरी गेल्या चार महिन्यापासून विलीनीकरणासाठी रुसून बसल्याने ग्रामीण भागासह सर्वांनाच प्रवासासाठी अव्वाच्या सव्वा भाडे देऊन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.यात एस टी चेही करोडोचे उत्पन्न बुडाले गेल्या एकसे पंचवीस दिवसापासून लालपरीची चाके रुतून बसल्याने खाजगी वाहतुकीची मात्र चांदी झाली आहे.
या विलीनीकरणाच्या लढाईत मात्र अनेक कर्मचाऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली व अनेक कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले.गेल्या चार महिन्यापासून चाललेली हि लढाई मात्र थांबण्याचे नाव घेत नाहीं. न्यायालयात मात्र तारीख पे तारीख सुरूच आहे.यात मात्र अनेक कर्मचाऱ्यांना पोट भरण्यासाठी रोजनदारीने कामाला जावे लागत आहे.
तर अनेकांनी व्यवसाय सुरु केला आहे. अनेकांना संसाराचा गाढा चालवण्यासाठी शेतीही विकण्याची वेळ आली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असलेली व सर्वसामान्यांची जीवन वाहिनी रुसून बसल्यामुळे विध्यार्थ्यांना सवलतीच्या मासिक भाड्यात शाळेत पोहोचवणारी एस टी गेल्या चार महिन्यापासून डेपोत धूळ खात पडली आहे.त्यामुळे विध्यार्थ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करून शाळेत जावे लागत आहे.
खाजगी वाहनाने वेळेवर शाळेत पोहचता येत नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.कोरोना काळात गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण भागात एस टी ची सेवा बंद होती आता कुठेतरी तुरळक बस सेवा सुरु झाली होती.तेवढ्यात गेल्या चार महिन्यापासून लालपरी रुसून बसली . त्यामुळे ग्रामीण भागाचा गावगाडा पूर्ण रुतून बसला आहे.एस टी बंद असल्यामुळे जेष्ठ नागरिकांना पूर्ण भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.
लालपरी विलीनीकरणाच्या विळख्यात रुसून बसल्याने खाजगी प्रवाशी टॅक्सी मात्र खदखद हसताना दिसत आहे . या लालपरीच्या लढ्याचा लवकरात लवकर मार्ग निघावा व लालपरिची टिन टिन पुन्हा कानावर यावी या साठी ग्रामीण जनता देवाला साकडे घालतांना दिसत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा