Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ मार्च, २०२२
केंद्र सरकार ची वन नेशन वन रेशन योजना संपूर्ण देशात लवखरच लागू होण्याचे चिन्ह
केंद्र सरकारने गोरगरीब आणि मध्यम वर्गीय नागरिकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली असून यासाठी ९६.८ टक्के नागरिकांना फायदा होणार आहे. सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार रेशन कार्ड धारकांना आपले हककाचे रेशन घेण्या करिता नवीन घोषणे नुसार आता रेशन कार्ड सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही याबाबत माहिती देताना अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियूष गोयल माहिती दिली की आता रेशन कार्ड धारकांना रेशन घेण्या करिता दुकांदारास रेशन कार्ड दाखविण्याची गरज नाही.आता पर्यंत रेशन दुकानातून धान्य घेताना सरकारी रेशन दुकानदारास रेशन कार्ड द्यावं लागतं होत.परंतु आता मात्र रेशन कार्ड धारकांस जिथे राहतात तिथे जवळच्या रेशन धान्य दुकानात रेशकार्ड नंबर आणि आधार नंबर सांगून सहज पने रेशन मिळू शकते.
मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले की रेशकार्ड प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आलेली आहे देशात वन नेशन ,वन रेशन कार्ड ची सुविधा लागू करण्यात येत आहे.सरकारी आकडेवारी नुसार आता पर्यंत देशात वन नेशन ,वन रेशन कार्ड द्वारे ७७ कोटी लोकांना जोडण्यात आले आहे.यात रेशन कार्ड वापरणाऱ्यांची संख्या ९६.८ टक्के आहे.यात ३५ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील लोकांना सामील करून घेतले आहे.
एखाद्या नागरीकाचे रेशकार्ड त्याच्या मूळ राज्यात असेल आणि नोकरी निमित्ताने ती व्यक्ती दुसऱ्या शहरात आपल्या कुटुंबासह राहत असेल तर त्याला त्याचा रेशकार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर देऊन कोणत्याही दुकानावर रेशन किंवा धान्य मिळू शकते.यासाठी रेशनकार्ड दाखविण्याची गरज नसल्याचे मंत्री गोयल यांनी सांगितले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक हेमंत पाटी...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा