Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ मार्च, २०२२

भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यात केवळ राज्य शासन व्यस्त असल्याचा आरोप भाजपा नेते गिरीश महाजन



नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे राज्यात वादंग निर्माण झाला आहे . याबाबत भाजपा नेते गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला.राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे वर्षानुवर्षे मिळणारे ओबीसी राजकीय आरक्षण मिळणे बंद झाले.मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही . आरक्षणाबाबत तांत्रिक बाजू पूर्ण करायच्या नाही.न्यायलयात आवश्यक कागदपत्रे द्यायची नाहीत आणि केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम करत आहे.एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न कायम आहे. नवाब मलिकांसह इतर भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यात केवळ राज्य शासन व्यस्त असल्याचा आरोप भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध