Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ मार्च, २०२२

शांताबाई धुडकू महाजन यांनी सहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे



शिरपूर प्रतिनिधी:तुमच्याकडे महाराष्ट्र बँकेचे कोणतेच कर्ज बाकी नाही.तुमचे कर्ज खाते बेबाक केले आहे यापुढे तुम्हाला कर्जाची आवश्यकता भासल्यास बँक ते देण्यास तयार आहे,अशा शब्दांत लेखी आश्वासन हातात पडल्यानंतर शांताबाई धुडकू महाजन यांनी सहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले.

येथील बाजार समितीच्या निबंधक आवारात सहाय्यक कार्यालयासमोर सोमवारी (ता.७ ) महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक एस.एस.वाणी,माजी व्यवस्थापक जगदीश कलाल यांनी शांताबाईंची भेट घेऊन त्यांना लेखी आश्वासन दिले.उपोषणात शांताबाईंच्या मागे भक्कम उभ्या राहिलेल्या धुळे जिल्हा जागृत जनमंचाच्या अध्यक्षा डॉ.सरोज पाटील , शेतकरी विकास फाउंडेशनचे मोहन पाटील , अॅड गोपालसिंह राजपूत यांच्या हस्ते शीतपेय घेऊन शांताबाई महाजन यांनी उपोषणाची सांगता केली . राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता हेमराज राजपूत , होळनांथे येथील प्रगतिशील शेतकरी नितीन राजपूत,प्रकाश जमादार आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध