Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ मार्च, २०२२

"तुझ्या उत्तुंग भरारी पुढे, गगनही ठेंगणे असावे, तुझ्या विशाल पंखाखाली, विश्व ते सारे विसावे! या दोघी योगेश्वरी मराठे आणि प्रेरणा मराठे यांना जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा



       शब्दांकन- नरेंद्र प्रकाश भोई

8 मार्च जागतिक महिला दिन विशेष या अनुषंगाने योगेश्वरी अनिल मराठे आणि प्रेरणा अनिल मराठे या दोघी बहिणींची यशोगाथा एरंडोल तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथील एक सामान्य कुटुंबातील योगेश्वरी अनिल मराठे आणि प्रेरणा अनिल मराठे या दोघी कुस्तीपटू त्यांचे वडील अनिल पंडित मराठे उर्फ अनिल पहेलवान (महाराष्ट्र चॅम्पियन) यांचा वारसा या दोघी बहिणींनी सुरु ठेवलाय हि एक कौतुकास्पद गोष्ट आहे लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे कुस्तीचा सराव सुरू ठेवून योगेश्वरी पाच ते सहा वर्षाची झाली आणि वडिलांबरोबर ती कुस्तीचा सराव बघायला जायची दंड सपाट्या उलट्या उड्या डिप्स वडील कसे मारतात ते बघून त्या दोघींनी ते प्रयत्न सुरू ठेऊन अनुकरण करायला लागले व  गुरु हनुमान कुस्तीगीर संस्था एरंडोल येथे मार्गदर्शक कोच भानुदास आरखे यांचा मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे  दोघे बहीनीं घेतात इयत्ता पाचवीमध्ये योगेश्वरी कुस्तीमध्ये तालुकास्तरावर प्रथम  पारितोषिक पटकावले 2016 मध्ये प्रथम जिल्हास्तरावर शेचाळीस किलो वजन गटात दुसरा क्रमांक 2017 मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक नाशिक विभागात दुसरा क्रमांक 2018 मध्ये राज्य महिला कुस्ती स्पर्धेत जूनियर कुस्ती महिला स्पर्धेत सहभाग नोंदवून 2018-19या कालावधीत शालेय स्तरावर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला यानंतर योगेश्वरी मराठे हिने अमरावती येथे झालेल्या 28 ते 31 ऑक्टोंबर 2018 मध्ये सहभाग नोंदवून एरंडोल शहराचे नाव उंचीवर नेऊन ठेवल आहे तसेच 46 किलो वजन गटात 2019मध्ये सबजुनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नागपूर येथे सहभाग 61 किलो वजन गटात  कुस्ती मध्ये प्रथम क्रमांक विभागात मिळालाय गुरु हनुमान कुस्तीगीर संस्था सर्व पदाधिकारी संचालक मंडळ सभासद बंधू सल्लागार मंडळी आणि आश्रयदाते मनोज भाऊ पहेलवान बबलू भाऊ पहेलवान मराठा समाज आणि क्षत्रिय मराठा समाज महाराष्ट्र यांनी सर्वांनी आर्थिक मदत देऊन पुढील वाटचाल या दोघी बहीनींनी सुरू ठेवून कुस्ती सराव कोच भानुदास आरखे यांच्या मार्गदर्शनाखाली  गुरू हनुमान कुस्तीगीर संस्था एरंडोल येथे सराव करू लागले कैलास वासी प्रल्‍हाद नारायण महाजन यांनी सरावासाठी त्यांच्या शेतात जागा उपलब्ध करून दिली सन 2019 20 मध्ये राष्ट्रीय सब जूनियर स्पर्धा (हिमाचल प्रदेश) या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र टीम मध्ये 62 किलो वजन गटात महाराष्ट्राचे नेतृत्व तसेच 2020 मध्ये आळंदी येथे झालेल्या प्रेरणा अनिल मराठे हिने 62 किलो वजन गटात सहभाग नोंदविला पहिल्या स्पर्धेत तिने (कास्य )पदक मिळवून एरंडोल तालुक्यसह जळगाव जिल्ह्यात इतिहास घडवला कोरोना काळ बघता परिस्थितीची वाट न बघता कोच मार्गदर्शक भानुदास  आरखे यांनी सराव सुरूच ठेवला 2021 मध्ये सातारा येथे 24 ते 26 ऑक्टोंबर वरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धेत 6 2किलो वजन गटात योगेश्वरी अनिल मराठे हिने (कास्य )पदक मिळवून मानाचा तुरा रोवला तसेच तिने कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत 62किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत जाण्याचा मान योगेश्वरी ला जातो नुकत्याच येत्या 12 मार्च ते 16 मार्च 2022 या कालावधीत बन्सीलाल चौधरी विद्यापीठ भवानी (हरियाणा प्रदेश) या ठिकाणी योगेश्वरी सहभागी होणार आहे तिच्या यशात तिची मेहनत जिद्द चिकाटी व कोच भानुदास आरखे वडील अनिल मराठे यांचाही त्या भगिनींना शिखरापर्यंत नेण्याच्या सिंहाचा वाटा आहे

"तुझ्या उत्तुंग भरारी पुढे,
गगनही ठेंगणे असावे,
तुझ्या विशाल पंखाखाली,
विश्व ते सारे विसावे!
या दोघी योगेश्वरी मराठे  आणि प्रेरणा मराठे यांना जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा

शब्दांकन- नरेंद्र प्रकाश भोई
माजी विद्यार्थी मास कम्युनिकेशन विभाग एम जे कॉलेज जळगाव



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध