Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ मार्च, २०२२

एसटी कर्मचाऱ्याचा कारवाईच्या धसक्याने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना



शिरपूर प्रतिनिधी:परिवहन मंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू न झाल्यास कारवाईची धमकी दिल्यानंतर शिरपूर आगारातील संपात सामील असलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा कारवाईच्या धसक्याने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.संतप्त नातेवाईकांनी मृत एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह जोपर्यंत परिवहन मंत्रासह संबंधित धिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. 

शिरपूर शासकीय रुग्णालयमध्ये या मृत एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह तसाच पडून असून जोपर्यंत मृत एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही,व त्यांची मागणी जो पर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृत झालेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी घेतला आहे.आरीफ शेख हसन मुजावर,वय 53 ,हे शिरपूर आगारात चालक पदावर असून गेल्या तीन महिन्यापासून एस टी महामंडळाचे राज्यशासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी ते संपात सामील होते.त्यामुळे आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने हे प्रकरण हाताळणार याकडे मृत एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांसह धुळे जिल्ह्यासह संपात सामील असलेल्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध