Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २६ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाची मोठी कारवाई.. धुळे येथील अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाची मोठी कारवाई.. धुळे येथील अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली
शिरपूर प्रतिनिधी: मुंबई - आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळील एका हॉटेलसमोर सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने सेंधव्याकडून येणाऱ्या एका पिकअपमधून १५० खोके विदेशी मद्यासह बिअर जप्त केली.या कारवाईत वाहनासह ९ लाख ७२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी बोराडी येथील वाहन चालकाला ताब्यात करण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बी.एस.महाडिक यांना पिकअपमधून एमएच ४८,टी- ४३६० मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या विषयीची माहिती दुय्यम निरीक्षक अतुल शिंदे यांना दिली. दुय्यम निरीक्षक सागर चव्हाण,एन.व्ही. ढगे,केतन जाधव,मनोज धुळेकर,रवींद्र देसले,शांतीलाल देवरे यांनी पळासनेर गावाजवळ सापळा रचला.तसेच सेंधव्याकडून भरधाव वेगाने येणारी पिकअप थांबवली.या वेळी चालक मुकेश बाळासाहेब पाटील रा.बोराडी याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली.त्यानंतर पथकाने पिकअपची तपासणी केली.
त्या वेळी पिकअपमध्ये मद्यासह बिअरचे एकूण १५० खोके आढळले.हा मद्यसाठा मध्य प्रदेशमध्ये निर्मित असून तो त्याच राज्यात विक्रीसाठी आहे.हा साठा शिरपूरकडे आणला जात होता.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई येथील आयुक्त कांतीलाल उमाप , संचालक उषा शर्मा,नाशिक विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ,धुळे येथील अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान,शिरपूर तालुक्यात यापूर्वीही अवैध मद्य पकडण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा