Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

साक्री तालुक्याच्या पांझरा-कान च्या कारखान्याचा चिमणीतून एकदाचा धुर निघु द्या !



पांझरा कान कारखाना चालू करणे यात जर का कुनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तर मात्र गय नाही असा सूचक इशारा तालुक्यातील
सर्वसामान्य जनतेने राजकीय पुढार्यांना दिला आहे
जिल्ह्यातील सर्वात पहिला, सर्वात जुना व राज्यात सर्वाधिक साखरेचा उतारा देणाऱ्या पहिल्या चारपाच कारखान्यातील एक असणाऱ्या साक्री भाडणे येथील पांझरा कान सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीतून पुन्हा एकदा धुर निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेली अनेक वर्षे बंद असणारा हा साखर कारखाना पुन्हा आहे त्याच जागेवर सुरु करण्यासाठी भाडे तत्वावर नाशिकचे उद्योजक पवन मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. परवा त्यांनी कारखाना साईटवर भेट दिली. शेतकर्‍यांशी चर्चा केली. हा कारखाना सुरु होणार म्हणून शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला. कारखाना सुरु करण्या बरोबरच इतरही उपक्रम या ठिकाणी सुरु करण्याचे मानस त्यावेळी पवन मोरे यांनी व्यक्त केले. चांगली बाब आहे. इतर उपक्रम सुरु होतील तेव्हा होतील. मात्र कारखाना सर्वात प्रथम सुर झाला पाहिजे. धुळे जिल्ह्यातला हा सर्वात पहिला साडेबाराशे टनी साखर कारखाना. साक्री तालुक्यातला एकमेव मोठा सहकारी प्रकल्प. पांझरा कान नद्यांवरील मालनगाव , जामखेली , काबऱ्या खडक प्रकल्प पांझरे वरील काही फड व विहिर सिंचन यातून साक्री तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले. पांझरा कान साखर कारखाना अनेक वर्षे साक्री तालुक्यातील शेतकर्‍यांचा भाग्यविधाता राहिला. प्रारंभी खूप डिव्होटी नेतृत्व या कारखान्यास लाभले. नंतर मात्र भ्रष्ट्राचार व बेलगाम नोकर भरतीने या कारखान्याच्या अर्थ कारणाचा गळा घोटला. शिवाजीराव दहिते यांच्या कार्यकाळात या कारखान्याच्या चिमणीचा धुर थांबला. कारखाना बंद पडला. पांझरा कान नंतर सुरु झालेले जिल्ह्यातील नवलनगरचा संजय काररवाना, शिरपूरचा शेतकरी कारखाना व शिंदखेडा हे साखर कारखाने तर अल्पजिवी ठरले . शहाद्यात मात्र पी. के . अण्णांचे समर्थ नेतृत्व लाभले. त्यांनी त्यांचा सातपुडा साखर कारखाना साडेबाराशे वरून पाच हजार टन क्षमतेपर्यंत वाढविला. त्या अनुषंगाने सुत गिरणी, पार्टीकल बोर्ड, कागद उद्योग वगैरे उद्योग व शिक्षणाचे मोठे जाळे त्यांनी विणले. शहादा तालुक्याचा कायापालट केला. मोहन भाउनीही प्रकाशे जवळ पुष्पदंतेश्वर कारखाना उभारला. मात्र आता तो आयन म्हणून खाजगीत चालविला जात आहे. नवापूरला माजी मंत्री सुरुपसिंग नाईकांनी डोकारे ला उभारलेला सहकारी साखर कारखाना त्यांनी व आता शिरीष नाईकांनी यशस्वीपणे चालविला आहे . मागील - मागील हे सहकारी साखर कारखाने सुरु आहेत. मात्र इतका जुना, इतकी चांगली रिकव्हरी असणारा पांझरा कान कारखाना वर्षानुवर्ष बंद रहावा. कामगार देशोधडीस लागावे. उस उत्पादक शेतकऱ्यांनी अन्य कारखान्याचे गेट ठोठावून ' गेटकेन ' टाकावा . हे चित्र काही बरे नव्हते. मध्यंतरी हा बंद कारखाना स्थलांतरित करण्याचाही विषय खूप गाजला. परंतू स्थानिकांचा ठाम निर्धार उपयोगी ठरला. दरम्यानचे पाठीमागचे राजकारण खूप मोठे आहे. तो स्वतंत्र विषय होवू शकतो. असे असले तरी आता भाडेतत्वावर का असेना, कारखाना सुरु होणार आहे . चहल - पहल दिसणार आहे . साक्री तालुक्यात चलन वलन व दळण - वळण वाढणार आहे. या एका मुद्यावर सर्वांनी एकमत करून या नवीन प्रयत्नांच्या पाठीशी उभे राहण्याची भुमिका घेतली पाहिजे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव साक्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध