Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३० मार्च, २०२२
आजपासून चार दिवस राज्यात उष्णतेची लाट, 'या' भागात तापमान चाळिशी पार
धुळे,जळगाव, मध्ये दरवर्षी मार्च महिन्यात ऊन तापायला सुरुवात होते, तर कमाल तापमानाचा पारा एप्रिलमध्ये चाळिशी गाठतो.
यंदा मार्चच्या शेवटच्या आठवडय़ातच राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर गेला आहे.
यंदा २१ ते २४ मार्च आणि २८ ते ३१ मार्च या कालावधीत दोन उष्णतेच्या लाटा नोंदवल्या जातील, असा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला.
बुधवारपासून शनिवापर्यंत राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय होत असून, सध्या कोकण वगळता राज्यातील बहुतांश भागात सरासरी कमाल तापमान ३८ ते ४० अंशांवर गेले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध जिल्ह्यांना उष्ण लाटेचा पिवळा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात ३० मार्च, १ आणि २ एप्रिल, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि अकोला या जिल्ह्यांत ३० व ३१ मार्च आणि १ व २ एप्रिल, अमरावती, बुलढाणा ३० आणि ३१ मार्च, चंद्रपूर ३१ मार्च, नागपूर ३० मार्च, यवतमाळ ३० आणि ३१ मार्च या कालावधीत या जिल्ह्यांत उष्णतेची लाट तीव्र जाणवणार आहे.
मार्च महिन्यातच राज्याचा पारा सरासरी ४१ अंशांवर गेल्याने यंदा मोसमी पाऊस वेळेवर येण्याची शक्यता आहे.
कमाल तापमानाचा पारा विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी येथे ४४ ते ४६ अंश तसेच रायगडमधील भिरा येथेही विक्रमी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे एप्रिलमध्येही कमाल तापमान वाढणार आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा