Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ मार्च, २०२२

आमच्या पक्षातर्फे आम्ही सर्व प्रयत्न केले होते तरीही मतदारांनी भाजपला बहुमत दिले ही चूक EVM ची नाही : ओवैसी



उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत एमआयएमला एकही जागा मिळू शकली नाही.त्यानंतर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी हा पराजय मान्य करुन मतदारांचे आभार मानले आहेत आमच्या पक्षातर्फे आम्ही सर्व प्रयत्न केले होते तरीही मतदारांनी भाजपला बहुमत दिले आहे,

आणि त्या निकालाचा मी आदरपूर्वक स्वीकार करत असल्याचे सांगितले.ज्या पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे, त्या पक्षातील नेत्यांनी आता ईव्हीएम मशिन्सवर खापर फोडले आहे.पण माझा आक्षेप त्या ईव्हीएमवर नाही तर लोकांच्या मेंदूत जी एक प्रकारची चिफ बसवली आहे त्याची ही चूक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.उत्तर प्रदेशमध्ये हा पराभव आम्हाला स्वीकारावा लागला असला तरी यापुढील काळातही आम्ही लोकांसाठी काम करत राहू


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध