Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १९ मार्च, २०२२
हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा , साक्रीसह धुळेकरांचे पोलिस प्रशासनाला निवेदन
साक्री प्रतिनिधी : शहरातील भोई गल्ली परिसरात नागरिक धुलीवंदन सण साजरा करीत असतांना काही धर्मांधांनी भोई समाजबांधवांवर अचानक हल्ला केला. त्यात दोन जण गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी झाले.तरी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी साक्रीसह धुळ्यात करण्यात आली . साक्रीत पोलिस निरीक्षकांसह तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.तर धुळ्यात एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,संविधानाने सर्वांना आपापले सण साजरे करण्याचे सारखे अधिकार दिले आहेत.साक्रीतील भोई गल्ली परिसरात भोई समाजाची मोजकीच घरे आहेत.ते सण साजरी करत असतांना हा हल्ला करण्यात आला.हा हल्ला पूर्वनियोजीत असावा.कारण दगड विटा व तिक्ष्ण हत्यार आणि तलवारी लगेच आणणे शक्य नाही.फक्त पुरुषच नव्हे तर समाजातील महिलांवरही हल्ला करण्यात आला.या घटनेनंतर भोई समाजातील लोक आणि महिला पोलीस पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता महिलांना हुसकवून लावण्यात आले.
तक्रार न घेता समाज बांधवांना कोठडीत टाकण्याची धमकी साक्री पोलिसांमार्फत देण्यात आली होती.
त्यामुळे खरंच न्याय हा सर्वांसाठी सारखाच आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला.
तरी भ्याड हल्ला करणा - या धर्मांधांना अटक करून कठोर कारवाई करावी ,अशी मागणी भोई समाज सेना आणि संपूर्ण भोई समाजातर्फे करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देतांना भोई समाज सेनेचे संस्थापक अध्यक्ष भिलेश खेडकर , प्रदेशाध्यक्ष रोहितभाऊ शिंगाणे,प्रदेश सचिव किरणभाऊ फुलपगारे,जिल्हा कार्याध्यक्ष राजूभाऊ फुलपगारे , जिल्हाध्यक्ष वीरेंद्र फुलपगारे,जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव,प्रदेश सदस्य बन्सी वाडीले ,जिल्हा उपाध्यक्ष निलेश फुलपगारे ,जिल्हा सचिव मच्छिंद्र फुलपगारे आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा