Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ मार्च, २०२२

मोदींच्या पुणे दौऱ्यावर आता सर्वांचेच लक्ष..! या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक



पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.दरम्यान,मोदी यांच्या दौऱ्याविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रद्रोहीमोदीपरतजा,असे हॅशटॅग चालवले आहेत.तसेच या आशयाचे बॅनर्स देखी लावण्यात आले आहेत.नेहमीच महाराष्ट्रासोबत दुजाभाव करणारा , महाराष्ट्राची बदनामी करणारा महाराष्ट्रद्रोहीमोदीपरतजा असे यावर लिहण्यात आले आहे.

कालच शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना या उदघाटन कार्यक्रमाला घेऊन मोदींवर टीका केली होती.या कार्यक्रमांपेक्षा युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची सुटका महत्वाची असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.मोदींच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आपल्याला विरोध करताना दिसत आहेत.त्यामुळे मोदींच्या पुणे दौऱ्यावर आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध