Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २० मार्च, २०२२

माननीय शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांचे आज शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन ठळक मुद्दे



बरेच दिवसांनी भेटतो आहे, एकाजागी बसून राहावे लागले. मागे बैठक झाली आणि दुसरी लाट आली त्यानंतर मानेचे दुखणे. परंतु काही दिवसात कानाकोपऱ्यात फिरणार.
शिवसंपर्क मोहीम नविन नाही. त्या माध्यमातून शिवसेनेचे विचार घराघरांत पोचवायचे आहे. एक सत्ता आल्यावर निखारे वरच जमलेली राखेवर फुंकर मारायची आहे शिवसैनिक हा धगधहता निखारा. तोच शिवसंपर्क अभियानाचा उद्देश. शिवसेनेचे दूत गेल्यावर चांगली नावे माझ्याकडे आली पाहिजे. त्यांना नविन आधार देण्याची गरज आहे. किती वर्ष गेली तरी तरुण हा शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न. पक्ष वाढवत असतांना एकदा जरी जिंकलो त्याची माहिती.
युती भाजपने तोडली. त्यांनी बांधणी केली तशी आपल्याला करायची आहे.
परंपरागत भाजप कडे होते तिथे आपण का लढवत नाही महिलांना समोर आणा. जिकणारे उमेदवार हवे, सदस्य, मतदार नोंदणी. आता सर्व निवडणुका गांभीर्याने घ्यायच्या आहे पंचायत ते पार्लामेंट. भाजपची ही निती घातक आहे. त्याला काटशह गरजेचा.
अयोध्याला गेलो तेव्हा मी सांगितले आम्ही भाजपला सोडलय हिंदुत्व नाही. हे राजकारणासाठी हिंदुत्व करताहेत आपण हिंदुत्वासाठी राजकारणात हा मूळ फरक. जस समोर विरोधक आहे त्याच्या कुरापती ओळखा. स्वत: काही केले ते न सांगता आपल्यावर टीका
उत्तर प्रदेश विजयाचे अवडंबर. असे नाही की भाजपचा दैदीप्यमान विजय झाला. भ्रम निर्माण करुन संमोहन करायचे प्रत्येक वेळी अनामिक भिती दाखवून हिंदुत्व खतरे मे. बालकांचा मृत्यू, हाथरस, इत्यादि अनेक दुर्घटना.
आपल्याला हिंदुत्व विरोधी ठरवतात. मध्येच काही कारण नसतांना एम आय एम ने महाविकास आघाडीत येण्याची विधान. आमचा आणि एम आय एम बरोबर जाणे कदापि शक्य नाही.
अफझल गुरूला फाशी देऊ नका म्हणाणारे मेहबूबा सारख्यांच्या मांडीला मांडी.
रास्व संघ यांची विधाने
मग काय मोहन भागवतांना खान वगैरे म्हणणार आहात? पहिले सावरकरांवर आम्हाला शिकवतात, भागवतांनी म्हटले सावरकर मुसल्मि विरोधी नव्हते उर्दूत गझल लिहिले आहे. रा. स्व संघाच्या विचारसरणीत आणि आपल्यात समानता. परंतु आम्ही काही केले तर वाईट तुम्ही केले ते आदर्श. संघ मुक्त भारत नितिश बोलले. ते सत्ते साठी याना चालतात हे भाजपचे राजकारण वाईट.
भागवत म्हणतात संघ का विचार है हिंदुत्व का विचार उस पर चलते रहो. हिंदु धर्मशास्त्र ये मानवधर्मशास्त्र है इसलिए हमारा हिंदु राष्ट्र है. विविधता मे एकता को दुनिया हिंदुत्व कहती है, इसमे मुस्लमान नहि चाहिए ऐसा आया तो वो हिंदुत्व है. यावर भाजपचे चमचे उत्तर देऊ शकतील का? हिंदुत्वाचे बाप आम्हीच आहोत असे सुध्दा उद्या हे म्हणतील. आपल्या तो बाबा इतरांचे गुंड
अनेकवेळा यांचे जवाब घेतले तरी थयथयाट, भाजप आणि आपल्यात फरक आपण खोटे बोलू शकत नाही. त्यांनी असत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य लावा.
१२ सदस्यांचे निलंबन ते म्हणतात आम्हाला न्याय दिला. परंतु फक्त कालावधी कमी केलेला आहे ती कारवाई योग्यच. या लहान गोष्टी समोर येणे गरजेचे.
राज्यपालांवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. वर्ष भर होऊन गेले तरी काही नाही हा सरकारचा अधिकार तो न करणे हा लोकशाहीचा खून. भाजपाचा कारभार म्हणजे ७ वर्षात काहीच केले नाही केवळ आम्हाला पाकधार्जिणे, देशद्रोही ठरवणे.
एक नविन फाईल तयार झाली पंडितांना वर अत्याचार झाले तेव्हा व्ही पी सिंग यांना तेव्हा भाजपचे समर्थन. पंतप्रधान व्ही पी सिंग यांना शिवसेनेने विरोध केला कारण ते जामा मशिदीत गेले होते तेव्हा भाजप एक शब्द बोलला नाही. तेव्हा फक्त बाळासाहेंनी सगळ्यांना अंगावर घेतले.अतिरेकी, अमरनाथ यात्रा इत्यादि अनेक
हिंदुस्थानात पाकिस्तान बस सेवा तेव्हा वाजपेयींनी सुरु केली इथं पासून न बोलावता पाकिस्तानात जाऊन केक खाणारे मोदी इथं पर्यंत आम्ही सगळे बघतो आहे. मग तुमचा काय हिजबूल पक्ष म्हणायचे का? आम्ही अस काही म्हणणार नाही. हिंदुत्व भाजपचे कसे थोतांड आहे, त्यांनी भीतीचा निर्माण केलेला हा भ्रम घराघरात जाऊन दूर करायचा.
हिटलर त्याचे प्रवक्ते चार फळ्या पहिली फळी त्याची सकारात्मक बाजू जनतेसमोर मांडणे, दुसरी विरोधकांना उत्तर देणे, तिसरे आरोप करणे चौथी अफवा पसरवणे गोबेल्स निती हीच भाजपची भीती. इतरांना सत्ता दिली तर खोटे भीतीचे चित्र उभे करायचे. एम आय एम सोबत कदापी युती नाही ही भाजप कडूनच आलेली ऑफर. औरंगजेबांच्या कबरीवर डोके टेकवणारा सोबत युती नाही. या परखडपणे जनते समक्ष पोचवाव्या लागतील या शिवसंपर्क मोहिमेत.
शिवसैनिक जे एकदा ठरवतो तो करुन दाखवतो. आता युवा सैनिक पण आहे.मी तुम्हाला शिवसेनेचा अंगार भंगारांना दाखवून द्या. नवहिंदू कडून जो बुरखा पांघरलेला आहे ते पवित्र काम हे शिवसैनिक केल्या शिवाय राहणार नाही. लवकरच महाराष्ट्र पिंजून काढणार. महाराष्ट्र काय आहे हे दिल्ली पर्यंत कळेल

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध