Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २५ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
पंचायत समितीचे उपसभापती ॲड.नरेंद्र मराठे यांचा वाढदिवसानिमित्त तब्बल एकशे दोन रक्तदात्यांनी रक्तदान करून दिल्यात शुभेच्छा.
पंचायत समितीचे उपसभापती ॲड.नरेंद्र मराठे यांचा वाढदिवसानिमित्त तब्बल एकशे दोन रक्तदात्यांनी रक्तदान करून दिल्यात शुभेच्छा.
साक्री पंचायत समितीचे उपसभापती ॲड.नरेंद्र उत्तमराव मराठे यांच्या वाढदिवसा निमित्त साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज दिनांक 25 मार्च 2022 रोजी करण्यात आले होते .या रक्तदान शिबिराचे दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस आण्णासो सुरेश सोनवणे , धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानासो.किरण शिंदे, धुळे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते आबासो पोपटराव सोनवणे , राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस श्री. ताहीर बेग मिर्झा , धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रा.नरेंद्र तोरवणे , राष्ट्रवादी किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गिरीश नेरकर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य श्री विजय भामरे , समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश बागुल , पिंपळनेर ग्रामपालीकेचे उपसरपंच श्री. विजूनाना गांगुर्डे ,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरसाठ , साक्री तालुका राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा.विलास देसले , साक्री तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.अक्षय सोनवणे , राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुकाध्यक्ष ॲड.वाय.पी. कासार ,राष्ट्रवादी सेवादल तालुका अध्यक्ष ॲड.सुनील नांद्रे ,साक्री तालुका राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्री.भैय्यासाहेब साळवे,राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री.जब्बार मन्सूरी, राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे करीम शहा , पंचायत समिती सदस्या श्रीमती रूथाताई बिलकुले , पंचायत समिती सदस्या श्रीमती प्रमिलाताई ठाकरे, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस श्री.सतीष बोरसे, श्री दिलीप पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मनीष सोनवणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्री सुनील मोहिते , श्री. हरिष मंडलिक,कार्तिक पिंपळे , राष्ट्रवादी युवक कांग्रेस उपाध्यक्ष प्रांजल आहिरराव ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष गितेश पाटील ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पाटील , आदी उपस्थित होते तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तदाते उपस्थित होते . यावेळी प्रास्ताविक करताना साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री.जितेंद्र मराठे यांनी सांगितले की कोणताही बडेजाव न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारसरणीनुसार 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्त्वानुसार समाज उपयोगी कार्य व्हावे अशी इच्छा उपसभापती ॲड.नरेंद्र मराठे यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखविली होती त्यानुसार रक्तदान हे सर्वात मौल्यवान दान आहे म्हणून रक्तदानाचा कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा केला जावा त्यानुसार आयोजकांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. याप्रसंगी विविध स्तरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यात प्रामुख्याने शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री.पंकज मराठे ,साक्री नगरपंचायतीचे नगरसेवक श्री सुमित नागरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य श्री. गोकुळ परदेशी,श्री.पंकज भामरे , मनसेचे श्री.धीरज देसले ,श्री.सुनील देसले,डॉ. घनश्याम अकलाडे,डॉ.राहुल देवरे ,डॉ.अतुल देवरे,डॉ. विवेक जाधव,डॉ.देवेंद्र देवरे, आष्टाणेचे माजी सरपंच राजेंद्र देवरे, कावठेचे माजी सरपंच रवींद्र बोरसे,कावठेचे माजी उपसरपंच निलेश ससले,शेणपूर चे ग्राम पंचायत सदस्य आकाश काकूंस्ते, नंदकुमार काकूंस्ते,तसेच जेस्ट नागरिक पंडित काळे,सामाजिक कार्यकर्ते भैया साळवे, समाजातील अनेक मान्यवर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आजच्या वाढदिवसा निमित्त तब्बल एकशे दोन रक्तदात्यांनी रक्तदान करून साक्री पंचायत समितीचे उपसभापती ॲड.नरेंद्र मराठे यांना शुभेच्छा दिल्या. त्या सर्व रक्तदात्यांचे साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. जितेंद्र मराठे यांनी शतशः आभार व्यक्त केले. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी श्री.सतीष बोरसे,श्री.दिलीप पवार,श्री. मनिष सोनवणे,श्री.सुनील मोहिते ,श्री.विजय पाटील प्रांजल आहिरराव, श्री.मिलिंद पाटील आणि जिवन ज्योती ब्लड बँक, धुळे यांनी परिश्रम घेतले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा