Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी यांची चिकसे ग्रामपंचायतीची 2 तासातच उरकवली चौकशी
साक्री पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी यांची चिकसे ग्रामपंचायतीची 2 तासातच उरकवली चौकशी
साक्री तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिकसे जीरापूर मध्ये आर्थिक अपहार झाल्याची तक्रार माजी ग्रा प सदस्य देविदास बर्डे यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहिती वरून मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या कडे केलेली होती त्या अनुषंगाने विस्तार अधिकारी महाले हे चिकसे गावात चौकशी साठी आले होते चौकशी साठी 12 वाजेला आले आणि 2 वाजेला काढता पाय घेतला चौकशी अपूर्ण सोडल्याने तक्रारदार देविदास बर्डे यांनी शंका व्यक्त केलेली आहे.
चौकशी दरम्यान आदिवासी समाजातील लोकांसाठी बांधण्यात आलेल्या बैठक शेड बघण्यात आला त्यात निव्वळ 4 पत्रे आणि चार खांब लावल्याचे दिसून आले गावातील सर्व गटारी उघड्या आणि घानेने तुडुंब भरलेल्या दिसून आल्या महिला स्वच्छलयात पाण्याची व्यवस्था नाही ट्री गार्ड 10 ते 15 च आढळून आले देविदास बर्डे यांनी अभ्यासिका व पंचायती साठीचे जलशुद्धीकरण यंत्र कुठं आहे असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला असता नंतर बघू आता वेळ नाही असे उत्तर देण्यात आले उर्वरित कामांची चौकशी करा अशी विनंती केली परंतु विस्तार अधिकारी महाले यांनी मस्टर ला शेरा मारून दिला व मला वेळ भेटेल तेव्हा येईल कोर्टात गेलात तर चकरा माराव्या लागता प्रक्रियेला खूप वेळ लागेल असे सांगून काढता पाय घेतला भ्रष्टाचार लपवताय की भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालता असा प्रश निर्माण झाला आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा