Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील दहिवेल ते पिंपळनेर रस्त्याच्या कामात किती लोकांचा बळी घेणार,नागरिकांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला खडा सवाल
साक्री तालुक्यातील दहिवेल ते पिंपळनेर रस्त्याच्या कामात किती लोकांचा बळी घेणार,नागरिकांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला खडा सवाल
दहिवेल ते पिंपळनेर रस्त्याचे काम अनेक दिवस उलटूनही कामाला कोणत्याही प्रकारची गती आली नसून वारंवार पेपर बातमी टाकूनही कामाला वेग आला नाही.ठेकेदाराने मात्र रोड खोदून झोप घेतलेली दिसत आहे.
त्याला त्या कामाबद्दल कोणतीही काळजी नसून त्याला आपण घेतलेल्या कामाचा विसर तर पडला नाही ना असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. दहिवेल बस स्थानकावर एवढी रहदारी असताना व हा मार्ग गुजरात ला देखील जोडला जातो परुंतु ठेकेदाराचे आडमुठे धोरण कुणाचा तरी बळी घेईल अशी भीती निर्माण होत आहे.
एवढ्या मोट्या थाटामाटात तालुकाचा आमदार मंजुळा गावित यांनी उदघाटन करून देखील जर या रस्त्यावर कुठलाही जीवितहानी झाल्यास व काही बरेवाईट घडल्यास ठेके दारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे दहिवेलकर नागरिकांनी धमकी वजा इशारा ठेकेदाराला दिला आहे. एवढे ठेकेदाराचे मुजोर वागणे कुणामुळे आहे.
तो कुणालाही जुमानत नाही.आमदार ताई ही भव्य दिव्य रस्त्याचे भूमिपूजन करून गेल्या त्यांचे ही कामाकडे लक्ष नाही संबंधित अधिकाऱ्यांनी व आमदार ताईंनी येत्या दोन दिवसात कामाकडे लक्ष न दिल्यास सामान्य जनतेचा उद्रेक होऊन पुढील दिवसात याचे परिणाम गंभीर होतील असा इशारा दहीवेल भागातील जनतेने दिला आहे.
तरुण गर्जन वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा