Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३० एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
नाशिक विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांचे आवाहन धुळ्यातील वातावरण शांत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत
नाशिक विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांचे आवाहन धुळ्यातील वातावरण शांत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत
धुळे : :शहरातील वातावरण शांत राहण्यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करावे. तसेच, तुम्ही एकत्र राहिल्यास शहरात काहीही होऊ देणार नसल्याचे विधान नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले आहे.
आगामी अक्षय तृतीया व इतर पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण शांत राहावे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी बाेलतांना समाजात काही घटक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील मात्र तुम्ही सावध होऊन सत्यता पडताळून याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलीस प्रशासन योग्य कारवाई करेल, असे आश्वासन शेखर यांनी बैठकीत दिले.
सध्या सोशल मीडियावर करडी नजर असून आक्षेपार्ह संदेश टाकणारा व पसरविणारा दोघेही गुन्हेगार असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. सोशल मीडियावर आक्षेपार्ह येणारे संदेश व क्लिप फॉरवर्ड करू नका, पोलिसांना कळवा. पोलीस प्रशासन त्यावर कठोर कारवाई करेल, असे शेखर म्हणाले.
तसेच राज्यघटनेच्या व सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसारच सर्वच प्रार्थना स्थळांवरील भोंग्याच्या आवाजाची मर्यादा व परवानगी तपासण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ईद आणि अक्षय तृतीया एकच दिवशी आल्याने हा गुण्यागोविंदाने राहण्याचा सुवर्णयोग असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. या बैठकीमध्ये शहरात शांतता राहण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी आवश्यक त्या सूचना व आवश्यक त्या उपयोजना झालेल्या बैठकीत पोलीस प्रशासनाला सुचविल्या आहेत. तसेच, शहरातील वातावरण शांत राहणार असल्याचे देखील काही सदस्यांनी पोलीस प्रशासनाला आश्वासन दिले आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधिकशक प्रवीण पाटील, पोलीस उपअधिक्षक प्रशांत बच्छाव, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त नितीन कापडणीस यांच्यासह शहरातील सर्वच समाजातील शांतता कमिटीचे सदस्य व जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा