Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ११ एप्रिल, २०२२

महात्मा ज्योतिबा फुले थोर समाजसुधारक व शिक्षण जनक होते : बबनराव चौधरी



शिरपूर प्रतिनिधी: महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजातील रंजल्या-गांजल्या घटकांसाठी अखंडपणे कार्यरत राहून त्यांना जगण्याचे बळ आणि दिशा ज्योतिबांनी दिली. महात्मा ज्योतिबा फुले हे थोर समाजसुधारक व शिक्षण जनक होते असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले. येथील भाजपा कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त बबनराव चौधरी यांचा हस्ते प्रतिमेस मार्ल्यापण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. वरवाडे येथील पुर्णाकुर्ती पुतळ्यास हि मार्ल्यापण करण्यात अले. 


याप्रसंगी धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, अनु. जाती मोर्चा मा. जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार यांनी हि आपले विचार व्यक्त केले. यावेळी संजय आसापुरे, आबा धाकड, जितेंद्र सुर्यवंशी, सुनिल चौधरी, महेंद्र पाटील, रोहित शेटे, मुबीन शेख, श्रीकृष्ण शर्मा, भालेराव माळी, पं. स. सदस्य यतिष माळी, राधेश्याम भोई, सतीष गुजर, नंदु माळी, नरेश गवळे, अजिंक्य शिरसाठ, लाला गिरासे, स्वप्निल पाटील सह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथा-परंपरांना धक्का देऊन स्त्रियांसाठी शिक्षणाची नवी वाट त्यांनी निर्माण केली. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजातील रंजल्या-गांजल्या घटकांसाठी अखंडपणे कार्यरत राहून त्यांना जगण्याचे बळ आणि दिशा दिली. सामाजिक विषमतेला खतपाणी घालणाऱ्या धर्म आणि रूढी परंपरांचा बिमोड करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणारे महान समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य आपण विसरु शकत नाही असे बबनराव चौधरी यांनी नमुद केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध