Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ११ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिवशंभो क्रिडा मंडळ निवे आयोजित रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन "रौप्यमहोत्सवी शिवशंभो करंडक २०२२"
शिवशंभो क्रिडा मंडळ निवे आयोजित रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन "रौप्यमहोत्सवी शिवशंभो करंडक २०२२"
खेड:(अक्षय कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचे शेवटचे टोक म्हणजे निवे गाव.निवे गावातील तरुणांनी २५ वर्षापूर्वी एकत्र येऊन ग्राम दैवत केदारनाथ देवस्थानाच्या नावाने शिवशंभो क्रिकेट मंडळाची स्थापना केली.२५ वर्षे अभिमानाची,२५ वर्षे एकजुटीची,२५ वर्षे शिवशंभो क्रिकेट संघातील खेळाडूंच्या मेहनतीची,२५ वर्ष निवे गावातील सर्व तरुणांच्या एकजुटीची.पंधरागाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवशंभो क्रिडा मंडळ निवे आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा "१४ एप्रिल २०२२ ते १६ एप्रिल २०२२" रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा "रौप्यमहोत्सवी शिवशंभो करंडक २०२२" या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत पंधरागावातील अनेक संघ सहभागी होणार आहेत.या स्पर्धेत प्रथम क्रमांक २५००१/-आणि भव्य चषक, द्वितीय क्रमांक १५००१/-आणि भव्य चषक,तृतीय क्रमांक ७००१/-आणि भव्य चषक,चतुर्थ क्रमांक ५००१/-आणि भव्य चषक आणि उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज,उत्कृष्टक्षेत्ररक्षक,मालिकावीर,
प्रत्येक सामन्यात सामनावीर,शिस्तबद्ध संघ,सर्वाधिक चौकार,सर्वाधिक षटकार अशी आकर्षक चषक आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा