Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १२ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
तालुक्यातील गांजा प्रकरण थांबण्याचे नाव घेत नसून आता त्याचे कनेक्शन मुंबईपर्यंत जोडले गेल्याने शिरपूर तालुक्यातील गांजा पोलिसांच्या रडारवर
तालुक्यातील गांजा प्रकरण थांबण्याचे नाव घेत नसून आता त्याचे कनेक्शन मुंबईपर्यंत जोडले गेल्याने शिरपूर तालुक्यातील गांजा पोलिसांच्या रडारवर
शिरपूर प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिरपूर राज्यभरात गांजा उत्पादनामुळे बदनाम झाले असून आता थेट शिरपूरचे गांजा कनेक्शन मुंबई डोंबिवली पर्यंत पोहोचल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे त्यामुळे आता शिरपूरचे गांजा प्रकरण पोलिसांच्या रडारवर आहे आणि शिरपूर तालुका तून सप्लाय झालेला गांजा डोंबिवलीत मिळून आला असून याबाबतची कबुली अटकेत असलेल्या आरोपी यांनी दिली आहे
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून गांजा आणून डोंबिवलीत विकणाऱ्या त्रिकुटाचा मानपाडा पोलीसानी पर्दाफाश केला आहे. दरम्यान तीन महिन्यापूर्वी देखील शिरपूर येथील गांजा तस्कर त्रिकूटाला मानपाडा पोलिसांनी अटक केली होती.त्यानंतर पुन्हा एकदा शिरपूर मधील दुसरी टोळी मानपाडा पोलिसांच्या हाती लागल्याने धुळे जिल्ह्यातील शिरपूर मानपाडा पोलिसांच्या रडारवर आले आहे.
डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुनिल तारमळे यांना डोंबिवलीतील देसले पाडा येथील एका घरात विक्री साठी गांजाचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे सुनील तारमळे यांच्या पथकाने देसले पाडा येथील एका इमारतीच्या घरात छापा टाकला या छाप्यात त्यांना सुमारे सहा किलो गांजा आढळून आला मानपाडा पोलिसांनी हा गांजा ताब्यात घेत घरात आढळलेला मोबाईल फोन, रोख रक्कम,गाडी असा एकूण १ लाख ८७ हजरांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी मयूर जडाकर व अखिलेश धुळप या दोघाना अटक केली.
या दोघांकडे चौकशी केली असता सदरचा गांझा त्यांनी शिरपूर येथून विकत आणला असल्याचे माहिती दिली.पोलिसांनी शिरपूर घाटात सुनील लोक भजन पावरा यांना शिरपूर येथून अटक केली.धुळे जिल्ह्यातील शिरपूर लाकड्या हनुमान गाव येथे एका जंगलात गांजाची शेती केली जाते. तेथून हा गांजा चोरट्या मार्गाने शहरात आणून विक्री केला जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.त्यामुळे आता शिरपूर पोलिसांच्या रडारवर आले आहे.हा गांजा शहरातील विद्यार्थी व उच्चशिक्षित लोकांना विकला जात असल्याचा संशय पोलीसानी व्यक्त केला असून त्या दिशेने पोलीसानी तपास सुरू केला आहे.
यापूर्वी देखील शिरपूर तालुक्यात अनेक वेळा लोकांच्या शेतीवर कारवाई होऊन एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शिवाय अधून मधून गांजा शेती व गांजा तस्करांवर पोलीस कारवाई करत असतात मात्र तरी देखील तालुक्यातील गांजा प्रकरण थांबण्याचे नाव घेत नसून आता त्याचे कनेक्शन मुंबईपर्यंत जोडले गेल्याने शिरपूर तालुक्यातील गांजा पोलिसांच्या रडारवर आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
साक्री प्रतिनिधी / साक्री पांझरा कान साखर सह. कारखान्याच्या आवारात भव्य असा शेतकरी मेळावा घेण्यात आला या यावेळी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा