Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीसांची काजण्यापाडा येथे छापा ६,५४०००/रूपयाचा गांजा जप्त



बभळाज/प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे शाखा धुळे व थाळनेर पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशनहद्दीतील भोरखेडा शिवारातील काजणीपाडाहुन भोरखेडा गावाकडे जाणा-या कच्च्या रस्त्याजवळच्या बाजुला पडक्या झोपडीत सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास धाड टाकली असता दोन गोण्यांमध्ये हीरवट रंगाचा फुल पाले बीया व देठसह अर्धवट ओलसर उग्र वासाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ ५४ कीलो ६५४०००/ रुपये कीमतीचा गांजा मिळुन आला.आपल्या आर्थिक फायद्यासाठी गांजा सदृश्य अमली पदार्थ कोणालातरी विकण्याच्या उद्देशाने अवैधरित्या कब्जात बाळगून होता परंतु पोलीस रेड होत

असल्याचे पाहताच संशयित आरोपी गोपाल मेहरबान पावरा राहणार लाकडे हनुमान तालुका शिरपूर व तानक्या पावरा रा.कांजण्यापाडा हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.पोलीस शिपाई यांच्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव,डीवाय‌एसपी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उमेश बोरसे अधिक तपास करीत आहे.

यापूर्वी देखील शिरपूर तालुक्यात अनेक वेळा लोकांच्या शेतीवर कारवाई होऊन एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शिवाय अधून मधून गांजा शेती व गांजा तस्करांवर पोलीस कारवाई करत असतात मात्र तरी देखील तालुक्यातील गांजा प्रकरण थांबण्याचे नाव घेत नसून आता त्याचे कनेक्शन मुंबईपर्यंत जोडले गेल्याने शिरपूर तालुक्यातील गांजा पोलिसांच्या रडारवर आला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध