Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

होळनांथे येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरा



शिरपूर/प्रतिनिधी :होळनांथे ता.शिरपूर येथे भगवान महावीर यांचा२६२१वा जन्म कल्याणक महोत्सव दि.१४ एप्रिल २०२२ गुरुवार रोजी साजरा करण्यात आला.
समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी झटणाऱ्या व जिवन व्यतीत करणाऱ्या जैन धर्मीयांचे चोविसावे तिर्थंकर भगवान महावीर यांनी अहिंसा,अपरिग्रह आदि हे पंचमहाव्रत आणि जिओ और जिने दो च्या माध्यमातून जगाला महत्त्वपूर्ण असा संदेश दिला.जगभरातील तत्वज्ञानी विचारवंतांना महावीरांच्या आगमवाणी तील सत्य नियमित चकीत करत असतात. अनेकांतवाद सारखे तत्व जगाला देवून मोठे काम केले आहे.


आज संत साध्वी हे दिक्षा घेवून साधू जीवन अंगिकार करत असताना महावीरांच्या तत्वांचा व विचाराचा प्रचार प्रसार करीत असतात.त्याद्वारे महावीरांचे तत्व हे जैनांपर्यंतच मर्यादित न राहता संपूर्ण जनसमुदायासाठी कसे उपयुक्त ठरु शकते असे दाखविले जाते.होळनांथे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात सकाळी स्थानक भवनपासून अहिंसा मोटरसायकल रॕली काढण्यात आली त्यात समाजातील युवावर्गाने मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.संपूर्ण होळनांथे गावातील प्रमुख रस्त्यांवरुन शांततेचा संदेश देत मिरवणूक निघाली.
त्यानंतर भ.महावीरांची प्रतिमा सजवलेल्या ट्रॕक्टरवर ठेवून 'जोर से बोलो जय महावीर','प्रेम से बोलो जय महावीर' जियो ओर जिने दो चा जयघोष करत बॅंन्ड पथकासह स्तवन व भजनांसह स्री पुरुष तरुण तरुणी व बालके यांनी संपूर्ण गावातून मिरवणूक काढली.ठिकठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांकडुन शीतपेय व पाणीवाटप करण्यात आले.तदनंतर स्थानक भवन मध्ये झालेल्या कार्यक्रमात खुशी पारख,हेतल व हीतेशी सेठीया,
दीपाली साबद्रा,जैनम व कनिका लोढा,कंन्या मंडळ यांनी स्तवन भजन व युती संचेतीने मनोगतात महावीर भगवान यांच्या त्यागाची महंती सांगत त्यांनी दीलेली शिकवणीचे पत्येकाने जिवनात आचरण करण्याचे सांगितले.महीला मंडळाने स्तवन सादर केलीत.या वेळी  भ.महावीरांचा पाळणा झुलवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला,यावेळी बहुसंख्य समाजबांधव आबालवृद्ध उपस्थित होते.
कार्यक्रम नंतर नवकारसी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

सदर कार्यक्रम साठी होळनांथे , मांजरोद,बभळाज,भाटपूरा,हिसाळे,थाळनेर शिरपूर व चोपडा तालुक्यातील वेळोदे घोडगाव येथील जैन धर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्थानकात झालेल्या कार्यक्रमत होळनांथे श्री.संघचे संघपती बन्सिलाल संचेती यांनी मार्गदर्शन करीत सुत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ,श्री.गुरु कन्हैय्या युवा मंडळ,सुशिल बहु मंडळ,महीला मंडळ,कंन्या तथा बालक मंडळांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी थाळनेर पोलीस स्टेशनचे सपोनि उमेश बोरसे, पीएसआय कृष्णा पाटील व त्यांचे कर्मचारी बंदोबस्त ठेवला होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध