Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २४ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
धुळे जि.प.च्या भाजप चा लोकप्रिय आरोग्य व शिक्षण सभापतींची तालुक्यातील प्रा.आ. केंद्रांना भेट
धुळे जि.प.च्या भाजप चा लोकप्रिय आरोग्य व शिक्षण सभापतींची तालुक्यातील प्रा.आ. केंद्रांना भेट
आज साक्री तालुक्यातील कासारे व सुकापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना आपल्या धुळे जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष आरोग्य व शिक्षण सभापती मा.सौ.ताईसाहेब मंगलाताई सुरेश पाटील यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भेट दिली. प्रत्येक आरोग्य केंद्रात तेथील रुग्णांना योग्य पद्धतीने आरोग्यविषयक सुविधा मिळतात का ? यासाठी आजची भेट महत्वाची होती. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी मा.ताईसाहेब यांनी गेल्या वर्षीदेखील अनेक आरोग्य केंद्रांना कोरोना काळात भेटी दिल्या होत्या.
आज कासारे आणि सुकापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली त्यावेळी धुळे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष मा.भैय्यासाहेब चंद्रजीत पाटील,धुळे जि. प.चे सदस्य मा.गोकुळसिंग परदेशी, कासारेचे मा.भाऊसाहेब सतीश देसले, धुळे जि.प.सदस्य,शेवडीपाडाचे साहेबराव गांगुर्डे,मालपूरचे माजी सरपंच नयनेश भामरे,कासारे येथील माजी पं.स.सदस्य मनीषा अनिल देसले,व मा.अनिलदादा देसले,भाजपचे स्वप्नील भावसार,सुकापूर आरोग्य केंद्राच्या भेटीप्रसंगी भाजपा पिंपळनेर मंडळाचे उपाध्यक्ष विकी कोकणी,सुकापूर चे सरपंच पंडित चौरे,तानाजी बहिरम सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी डॉ.जगन बहिरम, देवरे नाना,शिवाजी चौधरी तसेच तेथील रहिवाशांसह,अनेक मान्यवर ग्रामस्थ भेटीप्रसंगी उपस्थित होते.
जिल्यातील आणि साक्री तालुक्यातील आरोग्य केंद्रांच्या इमारतींची,तसेच तेथील पाणीपुरवठा,वैद्यकीय साहित्य,जनतेसाठी औषधसाठा इत्यादी स्थिती जाणून घेण्यासाठी आणि रुग्णांच्या,ग्रामस्थांच्या आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आणि तेथील स्टाफ च्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यासाठी तात्काळ योग्य मार्ग काढून सर्व प्रश्नांवर योग्य पर्याय उपलब्ध व्हावे यासाठी खासकरून आजची आरोग्य केंद्रांना दिलेली भेट महत्वपूर्ण मानली जाते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा