Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २३ एप्रिल, २०२२
अखेर राणा दाम्पत्याची आंदोलनातून माघार आम्ही मातोश्रीवर जाणार नाहीत
आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घोषणेपासून शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते राणा कुटुंबीयांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने करत होते. मात्र आता हे वादळ काहीसे शांत झाले असून राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाण्याचा निर्णय रद्द केला असून आंदोलन संपवत असल्याचं जाहीर केलं आहे.
यावेळी राणा दांम्पत्यानी पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्रात कुणाला घाबरण्याचं काम नाही. कुणाच्याही धमक्यांना घाबरण्याचं काम नाही. आम्ही कुठल्या दबावालाही बळी पडणारे लोक नाही. आम्ही लोकांची सेवा करून आणि विधानभवन आणि लोकसभेत पोहोचलो आहोत. आज आम्ही ठरवलंय की पूर्ण महाराष्ट्रात पोलीस, जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जरी हनुमान चालीसेचा अवमान केला असला तरी सगळ्यांना होणारा त्रास पाहाता आमचं आंदोलन आम्ही संपवत आहोत”, असं रवी राणा यांनी स्पष्ट केलं.
२३ एप्रिल रोजी आपण मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार असल्याचं राणा दांपत्यानं जाहीर केलं होतं. मात्र, आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणा दांपत्यानं आंदोलन थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. “राज्यात पोलिसांना, सामान्य जनतेला त्रास होऊ नये आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्तावित मुंबई दौरा रद्द होऊ नये यासाठी आम्ही आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं रवी राणा यांनी सांगितलं
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
नविनित राणा ही राजकीय नाट्य साठी फेमस कलाकार आहे नौटंकी करून मत घेतले आता विरोधात जाऊन काँग्रेस राष्ट्रवादी जीवा वर निवडून आली बाप बदलला नवऱ्यासाठी भाजपा उडी घेतली डान्सर तर होती आगोदर आता नटकिय आहे
उत्तर द्याहटवा