Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २६ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
धुळे यात्रेतील पालखीवर काम करणा-या कै. राकेश ने स्वताचे बलीदान देऊन पाण्याच्या बोटीतल्या सहा चिमुकल्यांचे वाचवले प्राण.....
धुळे यात्रेतील पालखीवर काम करणा-या कै. राकेश ने स्वताचे बलीदान देऊन पाण्याच्या बोटीतल्या सहा चिमुकल्यांचे वाचवले प्राण.....
धुळे-दि.23/4/2022रोजी धुळे एकवीरा देवी यात्रेत नेहमीप्रमाणे रात्रि साडेअकराच्या वेळेस जुने धुळे येथील रही वासी असलेल्या चिमुकल्यांना खेळण्यासाठी पाण्यात बोटी असलेल्या ठिकाणी कामावर असलेल्या कै राकेश वंसत वाघ हा यात्रेतील पाण्याच्या हौदात चिमुकल्यांसाठी बोटींचा सफर करवत होता... सहा ते सात चिमुकल्यांना त्याने बोटीत बसवले होते... अचानक त्याला यात्रेसाठी कान्ट्रेक्ट घेऊन लायटिंग ची व्यवस्था करणा-यांनी केलेली लायटिंग ची वायर वरून तुटली व ती कोणत्याही क्षणी पाण्यात कोसळणार असल्याचे दिसले त्याक्षणी त्याने होणा-या गंभीर घटनेचा तत्काल अंदाज लावत स्वताच्या जीवाची पर्वा न करता क्षणाचाही विलंब न लावता तो स्वता पाण्याच्या हौदात उतरला आणि भराभर भराभर त्याने बोटीतून उचलून मुलांना अक्षर बाहेर टाकले... आणि शेवटच्या लहानग्या मुलीला ही बाहेर टाकले त्याच वेळेस त्याचा पाय सटकला आणि त्याचा धक्का ने करंट असलेली तुटलेली वायर पाण्यात पडली आणि राकेश (गोलु)ही पाण्यात पडला आणि विजेचा प्रचंड धक्का लागून गतप्राण झाला....
कष्टकरी कुटूंबातील राकेश हा लहान मुलगा फक्त 22वर्षाचा मुलगा रोजंदारीचे काम करून परीवाराला मदत करायचा सामाजिक कार्यात नेहमी भाग घ्यायला लोकांसाठी सतत धावून जायचा... स्वताच्या कुटूंबाचा विचार न करता आज दुस-या ंचे जीव वाचवतांना त्याने स्वताचे बलिदान दिले ....अशा निस्वार्थी युवा कार्यकर्ता चे बलिदान व्यर्थ न जाता त्याची राष्ट्रपति साठी धुळेकर लोकप्रतिनिधींकडून करण्यात यावी.... त्याच्या बलिदानाचा योग्य सन्मान व्हावा ही अपेक्षा...
कै राकेश वसंत वाघ यास भावपूर्ण श्रद्धांजलि...
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
शूर वीर होता स्वतः ची जीवाची परवा न करता चिमुकल्यांचे प्राण वाचविले
उत्तर द्याहटवा