Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने व एकजुटीने काम करु या - आ. अमरिशभाई पटेल
बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने व एकजुटीने काम करु या - आ. अमरिशभाई पटेल
शिरपूर प्रतिनिधी :डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने व एकजुटीने काम करु या असे आवाहन करुन माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी सर्वांना उच्च शिक्षित होऊन शिरपूर तालुक्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी साथ द्यावी.तालुक्यात आपण दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण,पाणी,औद्योगिक, आरोग्य व सर्वच क्षेत्रात सर्वांच्या भल्यासाठी काम करतोय असे प्रतिपादन केले.
आ.अमरिशभाई पटेल यांनी भीम भगवान की जय अशा घोषणा देत पुढे म्हणाले की, कोरोना नंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात आपण उत्साहात कार्यक्रम साजरा करतोय.महाराष्ट्रात शिरपूर तालुक्याचे नाव विकसित तालुका म्हणून घेतले जाते,ही फार मोठी अभिमानाची बाब आहे.गेल्या 35 वर्षात आपण जीव ओतून काम केले. आपल्या तालुक्यात कायमस्वरूपी आपण सर्वांनी मिळून शांत वातावरण ठेवू या. शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून पाण्याचे मोठे काम आपण करुन आतापर्यंत शिरपूर पॅटर्नमधून 320 बंधारेबांधले.शिक्षणात मोठे काम करुन तालुक्यात 35 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.बाबासाहेबांनी जे सिद्धांत शिकवले आहेत,त्याचा आपण सर्वांनी अनुकरण करु या असेही आ. अमरिशभाई पटेल म्हणाले.
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर आमदार अमरिशभाई पटेल,जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे,आमदार काशिराम पावरा,प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल,माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया,राजू टेलर,ऍड.युवराज ठोंबरे, ऍड.भीमराव मोरे, देवेंद्र पाटील,प्रसन्न जैन,डॉ.मनोज महाजन,के.डी.पाटील,भटू माळी,अविनाश पाटील,राजेंद्र गिरासे, सुरेश अहिरे,बापू थोरात,राहुल रंधे, शामकांत ईशी,वासुदेव देवरे,हर्षल गिरासे, पिंटू माळी,भालेराव माळी आबा धाकड, संजय आसापुरे,कैलास धाकड,मनोज धनगर,सुभाष भोई, यतिष सोनवणे, अरुण धोबी,राकेश चौधरी,सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पिंटू शिरसाठ,गणेश सावळे,बापू थोरात,सुरेश अहिरे,विनायक वाघ,रमेश वानखेडे, राकेश थोरात, उत्सव समिती अध्यक्ष दादा शिरसाठ,उपाध्यक्ष दिपक अहिरे,बाबुदादा खैरनार,अनिल आखाडे,गोविंदा खैरनार, शौकिन कुंवर,किरण कढरे,भारत थोरात, भूषण थोरात, श्याम चांदे,पंकज थोरात, महेंद्र कढरे,विक्की ढिवरे,परशुराम थोरात, सतिष मोरे,अजय पाटोळे,राहुल बोरसे, नाना निकम,भारत सैदाणे,सिंधु कढरे, लाला हिरे,भैया थोरात,मनोज सिरसाठ, राजू कढरे,नागरिक, कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.
यावेळी डॉ. शिवाजी अशोक ढिवरे यांचा आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन करुन प्रविण शर्मा यांनी आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा