Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ६ एप्रिल, २०२२

भाजपा स्थापना दिवशी ४२ वर्षापुर्वी उपस्थित असलेले बबनराव चौधरी यांचा सत्कार पक्षाच्या ४२ वर्ष खडतर प्रवास : बबनराव चौधरी



शिरपूर : भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिनानिमित्त प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते येथील भाजपा कार्यालय परिसरात पक्ष ध्वजारोहण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.याप्रसंगी माजी पंतप्रधान कै.अटलबिहारीजी वाजपेयी,प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमा पुजन धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष के.डी. पाटील, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी ४२ वर्षापुर्वी भाजपा स्थापना दिवशी मुंबई येथे उपस्थित असलेले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा शहर व तालुका तर्फे सत्कार करण्यात आला. 

यावेळी मनोगत व्यक्त करतांना प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले की, दि. २१ ऑक्टोबर १९५१ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनी एक राष्ट्रदीपक प्रज्ज्वलीत केला. जनसंघाच्या दिव्याच्या त्या दिव्य प्रकाश झोतात अगणित कमळे आज देशभरात फुलली आहेत. दि. ६ एप्रिल १९८० रोजी "भारतीय जनता पक्ष" स्थापन झाला आणि राष्ट्रीय स्तरावर एका नवचेतनेचे स्फुरण झाले.अनेक द्रष्टे महापुरुष जनसंघापासून आपल्याला मिळत आलेले आहेत.भारतमातेच्या परम वैभवाकरिता व राष्ट्रमंदिराच्या उभारणीसाठी अनेकांनी आहुती दिली. असंख्य कार्यकर्त्यांच्या दृढ संकल्पाने देशात 11 कोटीच्या घरात सदस्य संख्या गेली असून भाजपा आज संपूर्ण जगभरात सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून मान्यता पावला आहे. 

देशात आज सर्वदूर सर्व सामान्य कुटुंबातून कमळे फुलली आहेत ती पण भारतमातेच्या चरणी समर्पीत होण्यास कटिबद्ध आहेत. "६ एप्रिल" भाजप"
स्थापना दिनाच्या वेळी मुंबई येथे उपस्थित राहण्याचा मला योग आला याचा मला अभिमान आहे.पक्षाचा ४२ वर्ष प्रवास हा अतिशय खडतर राहिला असुन या खडतर प्रवासातुन मार्गक्रम करत आज इथपर्यंत येवुन पोहचलो असल्याचे त्यांनी नमुद केले. ते पुढे म्हणाले की, जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष अशी ओळख निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा देशात स्थापना दिवस साजरा होत आहे. राजकारण हे राष्ट्रहितासाठी असावे या विचाराने प्रेरित असणाऱ्या भाजपाला आज सर्व स्तरांमधून पाठिंबा मिळतो आहे.

पार्टीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे. भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नाही तर देशासाठी काही तरी भरीव कार्य करण्याच्या आंतरिक इच्छेने जोडला गेलेला एक परिवार आहे. अनेक ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची वाढ झाली आहे व यापुढेही होत राहील.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे 

असे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सांगितले. कार्यक्रमास एकनाथराव बोरसे, संजय आसापुरे,आबा धाकड,भटू माळी मांडळ, मंगेश भदाणे, जितेंद्र सुर्यवंशी, सुनिल चौधरी,महेंद्र पाटील,रोहित शेटे, संजय चौधरी,श्रीकृष्ण शर्मा,योगीराज बोरसे, रविंद्र भोई,भुरा राजपुत,भालेराव माळी, शिंगावे विकासो माजी चेअरमन संजय पाटील,विक्की चौधरी,मुकेश पाटील,जितेंद्र पाटील हिंगोणी,सरपंच सोमा भिल,पं.स.सदस्य यतिष माळी, बदुलाल राठोड,अरविंद्र जाधव,मनोज भावसार,अमोल पाटील,रविंद्र सोनार, रफीक तेली,निंबा पाटील,अविनाश शिंपी,नंदु माळी,अनिल बोरसे, जितेंद्र माळी,अजिंक्य शिरसाठ,संजय पाटील, भुपेश परदेशी,राजुलाल मारवाडी,रविंद्र राजपुत,गणेश भावसार,केतन पंडीत,हेमंत बोरसे,गणेश माळी,प्रमोद पाटील,स्वप्निल पाटील पाटील,टिल्लु बोरसे सह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध