Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
सी.एम चे अभीष्टचिंतन हिच प्रभू चरणी प्रार्थना करून त्यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा व्यक्त
सी.एम चे अभीष्टचिंतन हिच प्रभू चरणी प्रार्थना करून त्यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा व्यक्त
आज शिरपूर येथील सहृदयी शिक्षक, समाज सेवक,एक सर्वगुणसंपन्न अवलिया व्यक्तीमत्व आदरणीय सी.एम भोई सर यांनी वयाची 66 वर्ष पूर्ण केलीत.67 व्या वर्षात त्यांनी पदार्पण केले आहे.त्यांचे नाव छगन महादू भोई आहे पण सर्व जण त्यांना इंग्रजी आद्याक्षराचे नावाने (सी.एम) ओळखतात नावा प्रमाणे त्यांचे स्वभावगुण वैशिष्ट्य पण आहेत.
सी.एम ज्या पद्धतीने पुर्ण राज्याचा भल्याचे निर्णय घेतात ठिक त्याच प्रमाणे ते समाज भल्याचे निर्णय घेतात.सी.एम.(chief Minister)ज्या पद्धतीने सर्व जाताधर्मातील लोकांना एकत्र आणतात ठिक त्याच प्रमाणे ते समाज बांधवांना एकत्र आणण्याचे काम करतात सी.एम राज्याचे असतात पण भोई सर शिरपूर भोई समाजाचे सी.एम च आहेत.सी.एम चा हा एक अर्थ झाला.सी.एम दुसरा अर्थ आहे "चतूर माणूस "ते खरच हुशार आणी चतूर पण आहेत.
सी.एम चा तिसरा अर्थ आहे सामान्य माणूस comman man.ईतके गुण,ईतक कार्य असून देखील सर्व सामान्य माणसा सारखे वावरत असतात. सी.एम चा चौथा अर्थ आहे clean man स्वच्छ माणूस.त्यांच्या नावातच त्यांचे सर्व गुण वैशिष्ट्य लपलेली आहेत.शिरपूर भोई समाजाचा एकते मध्ये त्यांच्या खूप मोलाचा वाटा आहे.त्यांच्या शांत स्वभाव,विचार पुर्वक निर्णय घेण्याची क्षमता,समाज विकासाची तळमळ,त्यांच्या वाणीतला गोडवा,
सर्वाना सोबत घेऊन चालण्याची त्यांची पद्धत खरच खूप कौतुकास्पद आहे.
आतापर्यंत वधूवर परीचय मेळावे, गुणगौरव सोहळे,संत भिमा भोई जयंती, तंटामुक्तचे काम,समाजातली जण जागृती ह्या कामात त्यांच्या मोलाचा वाटा आहे.
आतापर्यंतचा त्यांच्या प्रवास समाज प्रेरक राहिलेला आहे.त्यांनी केलेल्या उस्फूर्त कामगिरी बद्दल त्यांना नुकताच समाज जणजागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज त्यांनी वयाची 66 वर्ष पूर्ण केली असून 67 व्या वर्षात पदार्पण केलेले आहे.
त्यांची समाजाप्रती तळमळ तसूभर ही कमी झालेली दिसत नाही. त्यांच उर्वरित आयुष्य समाज विकासासाठी त्यांनी खर्ची घालावे यासाठी त्यांना परमेश्वराने चांगले आयुष्य व निरामय आरोग्य द्यावे.हिच प्रभू चरणी प्रार्थना करून त्यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा व्यक्त करतो.
शिरपूर तालुक्यातील समस्त भोई समाज बांधव व तरुण गर्जना वृत्तपत्र परिवार यांच्या वतीने सी.एम भोई सर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
शुभेच्छुक
कवी,लेखक,चित्रकार
श्री.यशवंत निकवाडे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा