Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १३ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
गरजू रुग्णांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करणारे उमरे ता.एरंडोल येथील सचिन पाटील येणाऱ्या भविष्यकाळात ५००० हजार रुग्णांना बरे करण्याचे उद्दिष्ट
गरजू रुग्णांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करणारे उमरे ता.एरंडोल येथील सचिन पाटील येणाऱ्या भविष्यकाळात ५००० हजार रुग्णांना बरे करण्याचे उद्दिष्ट
प्रत्येक तरुणाचे एखादे ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट असते.प्रत्येकाला वाटते मी डॉक्टर होणार,मी वकील होणार,मी राजकारणी होणार,मी सायंटिस्ट होणार,या समाजातील तरुण शिक्षण घेतात व स्वतःच्या कुटुंबासाठी तयार होतात.परंतु उमरे ता.एरंडोल येथील सचिन पाटील याला अपवाद आहेत.सचिन पाटील यांचं उद्दिष्ट येणाऱ्या पाच वर्षात 5 हजार रुग्णांना मदत करण्याचे आहे. वेगळ्याच प्रकारचे उद्दिष्ट सचिन पाटील यांनी ठरवून घेतले आहे.
आत्तापर्यंत तीन हजार दोनशे रुग्णांना मदतीचा हात दिला आहे.आरोग्य वर्धिनी बहुउद्देशीय संस्था उमरे,या संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे सामाजिक कामात पुढाकारपणा घेऊन,स्वखर्चाने लोकांच्या चांगल्यासाठी निर्णय घेणारे समाजामध्ये काही ठराविक लोक असतात.पैसे तर या दुनियेमध्ये सगळेजण कमवितात,परंतु मिळवलेल्या पैशातून लोकांच्यासाठी खर्च करणारे म्हणजे दानत असणारे मोजकेच लोक आहेत.त्यापैकी उमरे ता.एरंडोल येथील सचिन पाटील सामाजिक कामात मदतीसाठी पुढे येत आहेत.नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी सचिन पाटील सक्रिय आहेत.आरोग्य वर्धिनी बहुउद्देशीय संस्था,यांच्या वतीने जळगांव जिल्ह्यातील एरंडोल पारोळा पाचोरा रावेर भुसावळ,मुक्ताईनगर, चाळीसगांव,चोपडा,यावल,सावदा,व महाराष्ट्रातील अनेक गरजू लोकांना त्यांच्या बिघडलेल्या तब्येत सुस्थितीत आणण्यासाठी सचिन पाटील यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.जळगांव जिल्हा नव्हे, तर बाहेरील जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांनी सचिन पाटील यांच्या संस्थेने मदतीचा हात घेतला आहे माणूस म्हणून जन्माला आला की तो येणाऱ्या काळात मी भविष्यात इतके पैसे मिळविण्याचा प्रयत्न करेन,किंवा मी इतकी संपत्ती करेन,अथवा उच्च स्थानावर पोहोचेन असे वेगवेगळे प्रकारचे उद्दिष्ट माणूस ठेवून असतो.शिक्षण घेणारा प्रत्येक तरुण आपल्या आयुष्यात आपण काय होणार आहोत ? याची उद्दिष्टे तो ठरवत असतो त्याप्रमाणे तो पुढे जात असतो.माझ्या आयुष्यात काय होणार आहे ? त्याचा निर्णय या तरुणांनी घेतलेला असतो.सामाजिक कामात सहभाग घेऊन नागरिकांच्या मदतीला जायचे हे उद्दिष्ट सचिन पाटील यांचे आहे आरोग्य वर्धिनी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील यांनी आत्तापर्यंत जळगांव जिल्ह्यातील व इतर परिसरातील गरजू रुग्णांना मोठा मदतीचा हातभार लावला आहे.
आत्तापर्यंत ३,२०० रुग्णांना बरे करून त्यांना घरी व्यवस्थित पोहोचविण्याची जबाबदारी देखील आरोग्य वर्धिनी बहुउद्देशीय संस्थांच्या वतीने पूर्ण
करण्यात आली. येणाऱ्या काळामध्ये पाच हजार रुग्णांना मदत करण्याचे उद्दिष्ट सचिन पाटील यांनी ठरवले आहे.त्यावेळी साधारणपणे तीन हजार दोनशे रुग्णांना मदत केली होती.तेच उद्दिष्ट ठेवून सचिन पाटील यांनी,मी येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात किमान पाच हजार रुग्णांना बरे करीन,असे उद्दिष्ट ठेवणारा हा नवखा तरून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करत आहे.सचिन पाटील यांच्यावर स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी होती.
सचिन पाटील यांच्यावर मालखेडा,उमरे ग्रुप ग्रामपंचायत निवडणूकीची मोठी जबाबदारी देखील पार पाडली आहे.स्वतःच्या आयुष्याचे ध्येय व उद्दिष्ट बाजूला ठेवून समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो.ज्या नागरिकांनी आपल्या कुटुंबाला मोठा केलं त्या नागरिकांच्या मदतीसाठी आपण प्रयत्न करूया असा एक नवा आदर्श असणारा हा तरुण आज जळगांव जिल्ह्यातील आरोग्याच्या बाबतीत विशेष करून सचिन पाटील चर्चेत आले आहेत.
समाजामध्ये कोट्यावधी रुपये असणारे लोक वावरत असतात,परंतु नागरिकांच्या मदतीला येणारे कोट्याधीश मदतीला कधीच नसतात.पैशाच्या रुग्णालयात बाबतीत अनेकांना समस्या असतात,त्या ठिकाणी कोणी मदत करत नसते.त्या ठिकाणी आरोग्य वर्धिनी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य यांनी गरजू रुग्णांना पर्यंत पोहोचत आहे व त्यांना मदत करत आहे.अडचणीच्या काळात रुग्णांना मदतीचा हात देऊन समाजापुढे आदर्श निर्माण करणारा एकमेव तरूण म्हणून सचिन पाटील यांच्या कडे बघितले जाते...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
साक्री प्रतिनिधी / साक्री पांझरा कान साखर सह. कारखान्याच्या आवारात भव्य असा शेतकरी मेळावा घेण्यात आला या यावेळी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा