Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १३ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील पिंपळनेर फॉरेस्ट ची दमदार कामगिरी सापळा रचून लाकडाची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडले
साक्री तालुक्यातील पिंपळनेर फॉरेस्ट ची दमदार कामगिरी सापळा रचून लाकडाची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडले
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामधील पिंपळनेर येथील वनविभागाच्या पथकाने उमरपाटा ते महूमाळ खोकसा गावाजवळ सापळा रचून १.२९७ घनमीटरचे १७ नग सागवानी लाकूड जप्त केले आहे. या कारवाईत वाहनासह १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.वनविभागाच्या पथकाने १०.३० वाजेच्या सुमारास उमरपाटा ते महूमाळ खोकसा गावाजवळच्या रस्त्यावर सापळा रचून सागवानी लाकडाची वाहतूक करणारे वाहन क्र.एमएच १२ बीडब्ल्यू ४५४५ पकडले.मात्र वाहन सोडून चालक पसार झाला.कारवाईत ६ हजार ५०० रुपये किमतीचे १.२९१ घनमीटरचे १७ नग सागवानी लाकूड,१ लाख ५० हजार रुपये किंमतीचे वाहन असा एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सहाय्यक वन संरक्षक एस.व्ही.
पाटील.यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अरुण माळके, वनपाल मच्छींद्र बच्छाव,वनक्षेत्रपाल पश्चिम घाट भूषण वाघ,यांचा सह ए.पी.पवार,योगेश पवार,गुलाब बारीस,देविदास देसाई, एस.ए.सूर्यवंशी, के.एस.पवार, नाना विभांडीक,दिनेश घुगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा